March 9, 2026

महिलांसाठी योग : दैनंदिन ताण कमी करण्याचा प्रभावी मार्गयोग अभ्यासक डॉ. योगिनी उज्ज्वला यांचे मत : साधना पवार यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत संवाद सत्र

0
IMG-20260308-WA0065
Spread the love


पुणे : महिलांना दैनंदिन जीवनातील कामे पूर्ण करताना अनेकदा मानसिक ताण आणि शारिरीक थकवा येतो. नंतर अशाच छोट्या ताणाचे रुपांतर मोठ्या आजारात होते. अशावेळी आपल्या रोजच्या जीवनातील ताण कमी करण्यासाठी महिलांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून योग करणे महत्वाचे आहे. योगाने केवळ शारिरीक स्वास्थ नाही तर मानसिक आरोग्य देखील सुधारते, असे मत योग अभ्यासक डाॅ. योगिनी उज्ज्वला यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साधना पवार यांच्यावतीने स.प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हाॅल मध्ये महिलांसाठी संवाद सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. योगिनी उज्ज्वला उर्फ आऊ यांनी महिलांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या विविध आव्हानांवर मात करण्यासाठी प्रभावी आणि साध्या साधना-तंत्रांची माहितीही दिली. स्वतःच्या श्वासाचा वापर करून उत्तम आरोग्य निर्मीतीसाठी क्रिया योगाची माहिती त्यांनी दिली. श्वासन तंत्र, दीर्घ श्वसन, गरूड मुद्रा, महिलांना बरोबर लहान मुलांसाठी गणेश मुद्रा अशा विविध साधनेचा अभ्यास यावेळी उपस्थितांनी केला.

डॉ. योगिनी उज्ज्वला म्हणाल्या, क्रिया योग महिलांसाठी एक उत्तम मार्ग आहे, ज्यामुळे शरीर आणि मन संतुलित राहते. सकाळी थोडा योग केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, आणि प्राणायामामुळे मानसिक ताण कमी होतो, मन शांत होते. ध्यानामुळे महिला आपल्या भावनिक स्वास्थ्याची काळजी घेऊ शकतात. नियमित आसने पाठीचा वेदना, सांध्यांचे दुखणे टाळतात, रक्ताभिसरण सुधारते, हार्मोनल संतुलन राखले जाते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी