March 9, 2026

अश्वारोहण च्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उलगडला शिवकाळश्री शिवाजी कुल, पुणे संस्थेतर्फे आयोजन ; अश्वारोहण साहसी प्रात्यक्षिके

0
IMG-20260308-WA0029
Spread the love


पुणे : शो जम्पिंग ची चित्तथरारक प्रात्यक्षिके… आगीतून उडी घेणारे अश्व आणि अश्वारोहक… पारंपरिक युद्धकौशल्य असलेल्या टेंट पेगिंग चा थरार यांसह घोड्यांचा इतिहास, शौर्य आणि आधुनिक क्रीडा यांचा अद्भुत संगम पुणेकरांनी अनुभवला. सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर अश्वारोहण साहसी प्रात्यक्षिके पाहण्यासाठी स्काऊटच्या बालवीरांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या वतीने पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर अश्वारोहण साहसी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अॅकॅडमीतील सदस्यांनी यावेळी सादरीकरण केले. अकॅडमी चे प्रमुख गुणेश पुरंदरे यांचा स्वागत सन्मान ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आला.

गुणेश पुरंदरे म्हणाले, लहानपणीच्या लाकडी घोड्यापासून ते लग्नाच्या वेळी नवरदेवाच्या वरातीतील घोड्यापर्यंत घोडा आजही आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परंपरेचा इतिहास आणि आधुनिक ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील अश्वारोहण यांची रोमांचक प्रात्यक्षिके सामान्यांना अनुभवायला मिळाली.

सादरीकरणामध्ये घोडेस्वारी कशी करतात, घोड्यांच्या वेगांचे विविध प्रकार, आधुनिक काळातील अश्वरोहणाचे महत्त्व, शो जंपिंग, टेंट पेगिंग यांसह आगीतून उडी मारण्याचे प्रात्यक्षिक देखील यावेळी दाखविण्यात आले. अश्वारोहणाबद्दल लहान मुलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना देखील यावेळी माहितीपर उत्तरे देण्यात आली.

  • फोटो ओळ : श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या वतीने पंतसचिव स्काऊट क्रीडांगणावर अश्वारोहण साहसी प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अॅकॅडमीतील सदस्यांनी यावेळी सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी