मुळात मुली व महिलांचीच इच्छाशक्ती नाही , स्वसंरक्षण शिकण्याची ….
: ?
8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वत्र कर्तबगार मुली व महिलांचे कौतुक ,सत्कार होणार , व विविध पुरस्काराने गौरवण्यातही येणार…ही जरी आनंददाई बाब असली तरी….दिवसेंदिवस मुली व महिलांवरील अत्याचारात ही वाढ होतच आहे याकडे कोणी पाहणार आहे का नाही ? हा भयावह प्रश्न वाटतो …
आजही सर्वत्र छेडछाड,विनयभंग,भर रस्त्यात खून, अपहरण, छळ, असे किळसवाने प्रकार घडताहेत हे रोजच पहायला व ऐकायला मिळताहेत या अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी प्रत्येक मुली व महिलांनी स्वतःचे स्वतः स्वसंरक्षण केले पाहिजे यासाठी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे,कराटे मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले पाहिजे म्हणून वारंवार सर्व स्तरांतून सांगितले जाते परंतु मुलींनाच मुळात स्वसंरक्षण शिकण्याची इच्छाशक्तीच राहिली नाही असे सध्याच्या काळात दिसून येत आहे ,त्यांना केवळ सौंदर्य जपणे, मौजमजा करणे,कॉलेज जीवनामध्ये स्वतःला गुरफटून घेणे , अथवा मला वेळ नाही,मला जमेल की नाही,मला भीती वाटते, असे नकारात्मक विचार ,शब्द ऐकायला मिळतात…आणि विशेष म्हणजे आपल्या देशाच्या कर्तबगार, शूरवीर व स्वातंत्रवीर धाडसी महिलांचा इतिहास वाचून प्रेरणाही घेत नाही केवळ नऊवारी नेसून हातात तलवारी घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर चर्चेत राहायचं परंतु ती धमक मिळवायची नाही याचे वाईट वाटते….यामध्ये अनेक पालकही आपल्या मुलींना ठोस पाठिंबा देत नाही …पण ढोल पथकात, गर्भा,खेळण्यासाठी रात्रंदिवस पाठवतात ,मित्र मैत्रिणी मध्ये दिवस दिवस सहलीसाठी पाठवतात,परंतु आपल्या मुलीने धाडसी बनावे ,स्वसंरक्षण करण्यासाठी उत्कृष्ट असे कराटे,मार्शल आर्टचे प्रशिक्षण घ्यावे असे सांगणारे पालक आता दुर्मिळ झाले आहेत त्यामुळे मुली व महिला या कलेकडे वळल्या जात नाही ही अत्यंत संवेदनशील बाब समोर येत आहे याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे…आणि काळाची गरज म्हणून सध्याच्या अत्याचार ,छेडछाड,विनयभंग,खून, अपहरण याला निर्भीडपणे प्रतिकार करण्यासाठी व या अशा किळसवाण्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मुली व महिलांनी स्वतःचे स्वतः स्वसंरक्षण करण्यासाठी कराटे , मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले पाहिजे तरच या अशा जागतिक महिला दिनाला अर्थ प्राप्त होईल… व याचे महत्व द्विगुणित होईल…
आपले, लतेंद्र भिंगारे,अध्यक्ष , बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य व क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य…
