April 1, 2026

शि.प्र. मंडळीच्या नियामक मंडळ अध्यक्षपदी सुधीर काळकरपंचवार्षिक निवडणुकीत १२ सदस्यांची बिनविरोध निवड ; चिटणीसपदी रमा कुलकर्णी

0
IMG-20260303-WA0013
Spread the love


पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी या पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये १२ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून नियामक मंडळाच्या पहिल्या सभेत अध्यक्षपदी सुधीर काळकर, उपाध्यक्षपदी सीए राधेशाम अग्रवाल आणि चिटणीसपदी एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल च्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.

नियामक मंडळावर सीए राधेशाम अग्रवाल, राघव अष्टेकर, अनिल बर्वे, मनोज भालेराव, यशोधन भिडे, नवीन दासरी, सुधीर काळकर, तुषार कुलकर्णी, पराग ठाकूर (पुणे), सुनील जोशी (ठाणे), सुरेशबाबू मंकणी (सोलापूर), विवेक नायक (मुंबई) या १२ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. नियामक मंडळाची ही निवड २०२६ ते २०३१ या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी