February 27, 2026

भगवान बुध्दांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या उपदेशातच लोकशाहीचा उगम – केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले

0
IMG-20260227-WA0046
Spread the love

छत्रपती संभाजी नगर येथील जागतिक धम्म परिषदेचे उद्घाटन

छत्रपती संभाजी नगर/मुंबई दि.. 27 – महाकारुणीक भगवान बुध्दांनी भिख्खु संघाला दिलेला बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उपदेशातच लोकशाहीचा उगम आहे. भिख्खु संघात जेव्हा जेव्हा एखाद्या विषयांवर वाद होत होता तेव्हा भिख्खु संघातील बहुमताचा निर्णय भिख्खु संघ मान्य करीत होता. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या संकल्पनेनुसारच भिख्खु संघ काम करीत होता आणि भगवान बुध्दांनी दिलेल्या बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उपदेशातुनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय लोकशाही समृध्द केली आहे आणि जगाला अडीच वर्षापुर्वी बौध्द धम्मानेच लोकशाहीचा उपदेश दिलेला आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथील भिमटेकडी येथे आयोजित केलेल्या जागतिक धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

छत्रपती संभाजी नगर येथे भारतीय विनय अलंकार धम्म ज्ञान प्रशिक्षण केद्राच्या वतीने जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या आयोजन भिमटेकडी छत्रपती संभाजी नगर येथे करण्यात आले होते. या धम्म परिषदेचे उद्घाटन ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या धम्म परिषदेचे आयोजन पुज्य भिख्खुनी प्राध्यापिका धम्म दर्शना महाथेरी यांनी केले होते. या धम्म परिषदेत 30 देशातील व भारतातील प्रमुख भिख्खु आणि भिख्खुनी उपस्थित होते. कल्याण काळे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी म्यानमारचे पुज्य भदंत डॉ. आशिन उत्तमतारा सयाडु उपस्थित होते. तसेच डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो हे जागतिक धम्म परिषदेच्या स्वागताध्यक्ष पदी उपस्थित होते. यावेळी पुज्य भदंत हर्षबोधी महाथेरो (बुध्दगया) भदंत सिमादा पुशी महाथेरो (जपान) भदंत अजान अमनाथ महाथेरो (बॅकॉक) धम्म परिषदेच्या संयोजन समितीच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. अरविंद गायकवाड, तसेच भदंत सुगद शांती (बुध्दगया) मास्तर झेन (व्हिएतनाम) धम्म परिषदेच्या कोअर कमिटीचे उपाध्यक्ष अनिलकुमार बस्ते, अनिकेत ओवा, जोगेंद्र तायडे, दत्ता बनसोडे, तसेच रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम,, मिलींद शेळके, विजय  मगरे लक्षणभाऊ हिवराळे, दिलीप पाडमुख, बाळकृष्ण इंगळे, शरद शेगांवकर आदि मान्यंवर उपस्थित होते. या धम्म परिषदेस मराठवाडयातील आणि छत्रपती संभाजी नगरमधील मोठया प्रमाणात धम्म उपासक आणि उपासिका उपस्थित होत्या.  

भगवान बुध्दांनी दिलेला जगाला दिलेला बौध्द धम्म हा अखिल मानव जातीसाठी आदर्श जीवन मार्ग आहे. बौध्द धम्म हा मानवतावादी, विज्ञानवादी प्रज्ञा शिल करुणा, अहिंसा आणि विश्वशांतीचा विचार देणारा धम्म आहे असे गौरद्गार ना. रामदास आठवले यांनी काढले.  

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौध्द धम्माची दिक्षा देवुन भारतात पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तीत केले. बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे भारताची लोकशाही मजबुत केली. बौध्द धम्मातल्या बहुजन हिताय, बहुजन सुखाय समता, बंधुता या तत्वावर आधारलेली आहे. जगाला सर्वप्रथम बौध्द धम्मानेच लोकशाहीचा विचार दिलेला आहे असे ना. रामदास आठवले म्हणाले.  भिमटेकडी येथील विनय अलंकार धम्म ज्ञान प्रशिक्षण केंद्राला आपल्या खासदार निधीतुन 75 लाख रुपये टप्प्याटप्याने देणार असल्याची घोषणा ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली. 

हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी