’उमंग टुडेज वुमन’कडून नारी शक्तीला सलाम, हळदी कुंकू समारंभ साजरा करत केला महिलांचा सन्मान
स्त्री शक्तीचा सन्मान बऱ्याचशा उपक्रमांद्वारे केला जातो. स्त्रीत्व जपण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी महिलांचा सन्मान करणे ही अर्थातच वाखाण्याजोगी बाब आहे. आणि या स्त्रीशक्तीला दुजोरा देत त्यांच्याबरोबर स्त्रीत्व, संस्कृती, एकता साजरी करण्यासाठी उभंग टुडेज वूमन हा गट कुठेही मागे राहिलेला नाही. नुकताच म्हणजेच 19 फेब्रुवारी 2026 रोजी उमंग टुडेज वूमनकडून हळदी कुंकू उत्सव साजरा करत एक प्रकारे त्यांचा सन्मानच करण्यात आला.
प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिराजवळील व्रतमेजवानी येथे हा हळदीकुंकू समारंभ पार पडला. यावेळी उपस्थित महिला वर्गासह मजेदार उपक्रम राबवण्यात आले. लाईव्ह रांगोळी स्पर्धा, उखाणा स्पर्धा, थाळी सजावट स्पर्धा, नऊवारी लुक महाराष्ट्रीयन लूक स्पर्धा अशा अनेक स्पर्धांच नियोजन करून खास भेटवस्तू आणि विजेत्यांसाठी रोग बक्षीसही देण्यात आली. समस्त महिला वर्गांसाठी हा उत्सव मोफत होता.
पारंपरिक पोशाखात या महिला गटानं या कार्यक्रमाला हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली. उभंग टुडेज वुमन नेहमीच विविध उपक्रमांमार्फत महिलांना त्यांचा मानसन्मान मिळवून देत असते. आणि अशातच त्यांचा हळदीकुंकू समारंभही अगदी थाटामाटात संपन्न झाला आणि यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक महिलेला योग्य तो मानसन्मान दिला.
