February 24, 2026

किरीट सोमैयांचे ‘अतिरेकी आरोपांवर’ नाशिक पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा…!

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


काँग्रेसची मागणी ..
सोमैयांनी ‘अतिरेक्यांची संख्येसह असणारी माहीती’ पोलीसांकडे का दिली नाही..?
पोलीस प्रशासन या बाबत अनभिज्ञ कसे… (?). काँग्रेस चा गंभीर सवाल
पुणे दि २४ फेब्रुवारी २६ :  माजी खासदार व भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमैया हे मालेगांव (जि. नाशिक ) येथे जाऊन माध्यमांसमोर ‘बांगला देशी अतिरेकीं’ बद्दल संख्येसह नेमकी माहिती देत आहेत व प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचे समोर येत आहे, हा प्रकार गंभीर असल्याने नाशिक  जिल्हा पोलीस व प्रशासनाने या गंभीर आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा व कारवाई बाबत माहिती जारी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, भाजप नेते त्यांचे बॅाडी गार्ड वृत्तपत्रे प्रतिनिधीं व पत्रकारांना त्या विषयी प्रश्न विचारण्यास मज्जाव केल्याचे देखील टीव्ही चॅनेल वर पहायला मिळत असून, सोमैयांनी मालेगाव मध्ये असलेल्या अतिरेकी केंद्रा बद्दल जाहीर वक्तव्ये केलीत, त्या शिवाय ४,६०० बांगलादेशी अतिरेकी घुसल्याचा सनसनाटी आरोप देखील केला आहे.
या सर्व प्रकरणाची मालेगांव,  जिल्हा नाशिक प्रशासनाने, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाने या बाबत सत्य वास्तवते बाबत तातडीने खुलासा करावा.. ही सर्व नेमकी माहिती किरीट सोमैयांचे कडे असतांना, ती संबंधित पोलीस व प्रशासकीय यंत्रणेकडे का दिली नाही (?) असा सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.

संबंधित माहिती पोलीस प्रशासनास देण्याऐवजी ती स्वतः कडे ठेवल्याबद्दल किरीट सोमैयांना पोलीस प्रशासनाने तातडीने ताब्यात घेऊन, त्यांनी अतिरेकी अड्डा बाबत केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी व वास्तवता जिल्हा प्रशासनाने पुढे आणावी.. अन्यथा किरीट सोमैयांवर सामाजिक सलोखा व शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली कारवाई करावी..अशी मागणी देखील प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी