February 24, 2026

‘तेजस्वी’मधून शनिवारी (ता. २८) उलगडणारस्वातंत्र्यवीर सावरकरांची स्फूर्तिदायी गाथा

0
IMG-20260224-WA0036
Spread the love
  • वंचित विकास संस्थेतर्फे आयोजन; दुर्मिळ छायाचित्रे, गीतांतून दृकश्राव्य अनुभूती

पुणे: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अष्टपैलू जीवनाची स्फूर्तिदायक गाथा उलगडणाऱ्या ‘तेजस्वी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वंचित विकास संस्थेतर्फे येत्या शनिवारी (ता. २८) सायंकाळी ५ वाजता लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रोड पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात सावरकरांच्या दुर्मिळ छायाचित्रे आणि गीतांमधून दृकश्राव्य अनुभूती पुणेकरांना घेता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती संस्थेच्या कार्यवाह मीना कुर्लेकर यांनी दिली.

“प्रखर राष्ट्रभक्त, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, प्रतिभावान लेखक, संवेदनशील कवी, विद्वान व्याख्याते, उत्कृष्ट नाटककार, कठोर विज्ञाननिष्ठ, भाषाप्रेमी, समाजसुधारक, हिंदू संघटनासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबवणारे कृतिशील हिंदुत्ववादी असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध पैलू या कार्यक्रमातून उलगडून दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती, संकल्पना आणि लेखन सुधांशु नाईक यांनी केले असून, प्रसाद नातू, आरती परांजपे, चैत्राली अभ्यंकर आणि सुधांशु नाईक हे सादरीकरण, तर व्हायोलिनवर गोविंद कुलकर्णी साथसंगत करणार आहेत,” असे मीना कुर्लेकर यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी