February 21, 2026

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत एनएससीआय डोम वरळी मुंबई येथे संपन्न झाला.

0
IMG-20260221-WA0021
Spread the love

या प्रसंगी राज्यपालांच्या हस्ते पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रतिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान हे पर्यावरण रक्षणाचे दैवी कार्य असून यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी गांभीर्यपूर्वक प्रयत्न केल्यास विकसित भारताचे लक्ष गाठता येईल तसेच भावी पिढ्यांकरिता सुरक्षित वसुंधरा निर्माण करता येईल असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानातील यशोगाथांवर आधारित “कॉफी टेबल बुक” आणि “द क्लायमेट चेंज लेक्सिकॉन” या मराठी-इंग्रजी पर्यावरण शब्दकोशाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम देवेंद्र सिंह तसेच वरिष्ठ अधिकारी व निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी