छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमाराचे जनक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
पोर्टब्लेयर (श्रीविजयपुरम) दि.21 ~ छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असणारे राजे होते. धैर्य आणि शौर्याचे ते महामेरू होते.त्यांनी परकीय आक्रमकांना रोखण्यासाठी सर्वप्रथम सागरी सुरक्षेचे महत्त्व ओळखले.त्यासाठी पहिले स्वदेशी स्वतंत्र आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले.आज अंदमान निकोबार या भारताच्या बेटांवरील सागरी सीमेचे रक्षण करणाऱ्या नाविक दलासह तिन्ही दलांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थानी आहेत. भरतेय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य संपूर्ण भारत देशाला प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
अंदमान निकोबार ची राजधानी पोर्टब्लेयर ( श्रीविजयपुरम ) येथे महाराष्ट्र मंडळ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून na. रामदास आठवले बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोर्टब्लेयर चे नाव बदलून श्रीविजयपुरम असे नवे नाव दिले आहे. श्रीविजयपुरम च्या समुद्रकिनारी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेने तर्फे सर्वप्रथम तिरंगा राष्ट्रध्वज उभारला त्या ऐतिहासिक फ्लॅग पॉइंट वर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंदमान निकोबार चे खासदार विष्णू पद रे; जिल्हा परिषदेचे श्री अधिकारी; रिपब्लिकन पक्षाचे अंदमान निकोबार प्रदेश अध्यक्ष राहुल राम; प्रमोद काकडे; महाराष्ट्र मंडळाचे गोपीनाथ पाटील; सुनीता पाटील; नगरसेविका विनिता मल्होत्रा ; प्रोतिमा बॅनर्जी; प्रीती सुनील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमीकावा या युद्धतंत्राने अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी शिस्तबद्ध सैन्य उभारले.त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणताही जातीभेद धर्मभेद नव्हता.त्यांनी राष्ट्रीय आणि सामाजिक एकता देशाला शिकविली आहे.त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एकता रॅली काढून अंदमान निकोबार च्या महाराष्ट्र मंडळाने स्तुत्य उपक्रम केला असल्याचे सांगत ना. रामदास आठवले यांनी संयोजकांचे केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संपूर्ण पोर्टब्लेयर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीला एकता रॅली नाव देण्यात आले होते.या एकता रॅली ला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि अंदमान निकोबार चे खासदार पद रे यांच्या हस्ते दुपारी हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या रॅलीचे संध्याकाळी
फ्लॅगपॉईंटवर सभेत रुपांतर झाले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अर्पण करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी मराठी सह सर्व भाषिकांनी मराठी वेशभुषा करून सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर करण्यात केले.यावेळी वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत उत्कृष्टपणे सादर करण्यात आले.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
