February 18, 2026

युवराज गाडवे यांना गुंफण उद्योगरत्न पुरस्कार२१ वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन

0
IMG-20260218-WA0052
Spread the love

पुणे : गुंफण अकादमी कराड आणि भारतीय शिक्षण संस्था कोथरूड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात उद्योजक युवराज गाडवे यांना गुंफण उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जे.पी.नाईक साहित्यनगरी, जे.पी.नाईक शिक्षण आणि विकास केंद्र, कोथरूड येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गाडवे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अकादमीचे अध्यक्ष डॉ.बसवेश्वर चेणगे, उपाध्यक्ष बबन पोतदार, सचिव गजानन चेणगे आदी उपस्थित होते.

‘काका हलवाई’ च्या माध्यमातून युवराज गाडवे यांनी मिठाई, नमकीन सह विविध खाद्यपदार्थ ग्राहकांच्या सेवेत आणले आहेत. गुणवत्ता, विश्वास यांच्या जोरावर काका हलवाई हा ब्रँड झाला असून पुण्याच्या विविध भागात त्यांच्या शाखा आहेत. गाडवे कुटुंब या व्यवसायात सक्रिय असून युवराज गाडवे हे नाविन्यपूर्ण कल्पनांनी व्यवसायला नवा आकार देत आहेत. तसेच बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, भिकुबाई मेनकुदळे ट्र्स्टचे विश्वस्त म्हणूनही ते सामाजिक कार्यात उत्तम योगदान देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी