February 16, 2026

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वपक्षीय इच्छाशक्ती अत्यावश्यक – हाजी जुबेर मेमन

0
PHOTO-2026-02-15-18-50-44
Spread the love

पुणे, दि. —— : मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि बेरोजगारी या मूलभूत प्रश्नांवर सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे ठोस भूमिका घेतली पाहिजे. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वपक्षीय इच्छाशक्तीच खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष हाजी जुबेर मेमन यांनी केले.

पुण्यात आयोजित महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मुस्लिम समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भव्य सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमास राज्यभरातून मोठ्या संख्येने नगरसेवक व समाजातील मान्यवर उपस्थित होते.

हाजी मेमन पुढे म्हणाले, “आज विविध समाजघटक आपल्या प्रश्नांसाठी संघटित होत आहेत. मुस्लिम समाजानेही पक्षभेद बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येणे गरजेचे आहे. युवक आणि महिलांनी राजकारण व समाजकारणात सक्रिय सहभाग घेतल्यास समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल.”

समारंभात मुस्लिम समाजामध्ये मराठी भाषेचे ज्ञान वाढावे या उद्देशाने ‘चला मराठी शिकूया’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या. भाषिक सक्षमता ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, संभाजीनगर, संगमनेर, अहिल्यानगर, मुंबई, सातारा, कोल्हापूर आदी भागांतील नगरसेवकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून कार्यक्रमाला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.
   या समारंभास
हाजी जुबेर मेमन”महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स चे संस्थापक अध्यक्ष”खारी इद्रिस अन्सारी”फरीद खान पुणे शहर अध्यक्ष”महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स”
कलाकार आसिफ अलबेला”मालेगाव”
कारी मुद्दसिर ,सुलतान शहा”
तारीख जमील,ईलहाजोद्दीन फारुखी,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष..
कामील शेख”आदिल पब्लिकेशन
एकबाल अन्सारी,मजहर शेख
अक्रम मदारी , यासह राज्यातील विविध पक्ष संघटनाचे नवनिर्वाचित नगरसेवक ,महिला ,युवक व महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स चे पदाधिकारी  व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी