February 15, 2026

महाशिवरात्रीनिमित्य दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडीकै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्केश्वराची पूजा

0
IMG-20260215-WA0049
Spread the love

पुणे : बारा ज्योतिर्लिंगची चित्रे… बदाम, मनुके, द्राक्षे यांसह विविध प्रकारच्या फळे, फुलांनी सजलेली चक्क्याची शंकराची पिंडी आणि रेखीव असा उमा शंकराचा चक्क्याचा मुखवटा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात साकारण्यात आला. बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात तयार केलेली १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंडी व लीना भागवत तसेच लता व प्रमोद भगवान यांनी जागेवर तयार केलेला हा मुखवटा पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नाली पंडित, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, कुणाल टिळक, यांसह नितीन पंडित यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.

मंदिरातील पुरुषोत्तम वैद्य गुरुजी यांचा मार्गदर्शनाखाली सेवेकरी उमेश धर्माधिकारी, प्रताप बिडवे, अशोक दोरुगडे, शोभा गादेकर, नंदकुमार चिप्पा, वैभव निलाखे, वासंती घडशी आदींनी चक्क्याची शंकराची पिंडी आणि आरास दोन तासात साकारली. सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन ही चक्केश्वराची पूजा साकारण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात दरवर्षी चक्केश्वराची पूजा करण्यात येते. यावर्षी १०१ किलो चक्का वापरुन शंकराची पिंडी साकारण्यात आली. भगवान शंकराच्या मुखवट्याची प्रतिकृती हे विशेष आकर्षण होते. तसेच बारा ज्योतिर्लिंगची चित्रे देखील मंदिरात लावण्यात आल्याने भक्तांना एकाच ठिकाणी दर्शन मिळाले. या चक्क्याचे श्रीखंड करून मंदिरातील भक्तांना आणि सामाजिक संस्थांमध्ये देण्यात येईल.

सन २०२२ मध्ये महाशिवरात्रीला उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री दत्त मंदिरात ही पिंड साकारण्यासाठी स्वतः सहभाग घेतला होता याची विशेष आठवण अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितली.

  • फोटो ओळ : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची पिंडी, मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. बारा ज्योतिर्लिंगचे फोटो आणि चक्क्याची शिवपिंडी व मुखवटा पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी