February 14, 2026

-सुवर्णयुग तरुण मंडळाचा शिवजयंती उत्सव रविवारपासून (दि.१५)शिवव्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह आरोग्य शिबीराचे आयोजन

0
IMG-20260213-WA0012
Spread the love

पुणे : सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सवाला रविवारपासून (दि.१५) प्रारंभ होत आहे. दिनांक १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे करण्यात आले आहे. यामध्ये शिवव्याख्यान, मृत्युंजय हे महानाटय, दिव्यांगांसाठी आरोग्य शिबीर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी दिली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता दिव्यांगांकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोफत व्हिलचेअर, ट्रायसिकल, स्वयंचलित हात वाटप करण्यात येणार आहेत. दररोज सायंकाळी ७ वाजता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रविवारी (दि.१५) लेखक केतन पुरी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब याविषयावर व्याख्यान, सोमवारी (दि.१६) शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा समाज याविषयावर व्याख्यान होईल.

मंगळवारी (दि.१७) इतिहास अभ्यासक, लेखक व शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे शिवव्याख्यान होणार आहे. तर, बुधवारी (दि.१८) सायंकाळी ५ ते ७ यावेळेत शिवशंभू प्रतिष्ठान आयोजित शिवकालीन युद्धकला – मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार असून त्यानंतर कीर्तनकार, कथाकार बाजीराव महाराज बांगर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील समजय गैरसमज या विषयावर व्याख्यान होईल.

शिवजयंतीच्या दिवशी गुरुवारी (दि.१९) दुपारी ४ वाजता पारंपरिक वाद्यवादन होणार असून सायंकाळी ७ वाजता शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट निर्मिती गणेश लोणारे व सहकारी प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील मृत्युंजय हे धगधगते महानाटय सादर होणार आहे. सर्व कार्यक्रम शिवप्रेमींसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रकाश चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी