April 1, 2026

ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा पंचम पदवी प्रदान व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि.१)कै.डॉ. धुंडीराज पाठक गुरुजी स्मृतीदिनानिमित्त विशेष गौरव समारंभ ; शारदा, रत्नमाला पुरस्कारांसह विविध पुरस्कारांचे होणार वितरण

0
IMG-20260130-WA0017
Spread the love

पुणे : ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने पंचम पदवी प्रदान सोहळा व भव्य पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी वास्तुशास्त्रातील गुरू कै. डॉ. धुंडीराज पाठक गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष श्रद्धांजली व स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पद्मावती जवळील विणकर सभागृह येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेच्या संपर्कप्रमुख अ‍ॅड. श्रुती योगेश पिसे तसेच संस्थेचे हितचिंतक व सल्लागार प्रसाद शामसुंदर शिरोडकर हे उपस्थित होते.

मुख्य पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. या सोहळ्यात वास्तुविशारद, अंक विशारद, वास्तु भूषण, वास्तुरत्न तसेच वैदिक टॅरो रीडर या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रसंगी वास्तु, ज्योतिष व अध्यात्म क्षेत्रातील अनेक मान्यवर, तज्ज्ञ व अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. या पंचम पदवी प्रदान सोहळ्यांतर्गत महाराष्ट्रासह देश-विदेशातून विविध वयोगटांतील विद्यार्थी व विविध अभ्यासक्रमांतून शिक्षण पूर्ण केलेल्या सुमारे १५० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी म्हणाले, या वर्षीचा हा सोहळा विशेष महत्त्वाचा असून तो माझे वास्तुशास्त्रातील गुरू कै. डॉ. धुंडीराज पाठक गुरुजी यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात येत आहे. त्यांच्या वास्तुशास्त्रातील अमूल्य योगदानाची आठवण म्हणून स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी लंडन येथून जितेंद्र ओमप्रकाश भट्टड हे विशेष उपस्थित राहणार असून खास या कार्यक्रमासाठी ते भारतात येणार आहेत. तसेच या भव्य सोहळ्याचे उद्घाटन हैदराबादचे ज्येष्ठ ज्योतिर्विद भाऊसाहेब रंगनाथ कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

सकाळी १० वाजता विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण रत्नमाला रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ वास्तु अभ्यासक डॉ. दिलीप नेमीचंद नहार यांना रत्नमाला पुरस्कार, ज्येष्ठ वास्तुगुरु नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांना त्यांच्या उल्लेखनीय लेखनासाठी शारदा पुरस्कार, वीरवाडी (नसरापूर) येथील अम्नाय वाटिका वेद पाठशाळेचे संस्थापक व प्रमुख आचार्य वेदमूर्ती घनपाठी गोपाळ भुजंग जोशी गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, तसेच वेदमूर्ती वैभव कुलकर्णी गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच दुपारच्या सत्रामध्ये ज्येष्ठ ज्योतिर्विद व प्रख्यात ज्योतिष अभ्यासक वि. श. अष्टेकर गुरुजी यांना ज्योतिष रत्नकार गुरु कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कै. डॉ. धुंडीराज पाठक गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारे मनोगत, आठवणींचे कथन तसेच श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या शिष्यवर्गाकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून वास्तुशास्त्र परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वास्तू स्थळी नेऊन प्रात्यक्षिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात वास्तू डिझाईन व वास्तू परीक्षण करताना प्रत्यक्ष अनुभवाचा मोठा लाभ होणार असून त्यांचे व्यावसायिक कौशल्य अधिक सक्षम होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थी मनोगत, प्रात्यक्षिक वास्तू व्हिजिट तसेच अनुभव कथनाचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. हा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजित केला जात असून, संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांतून प्रशिक्षित झालेले अनेक विद्यार्थी आज समाजात यशस्वीपणे कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी