दादा, क्रीडा क्षेत्राचा अनमोल मार्गदर्शक हरपला…. लतेंद्र भिंगारे, मार्शल आर्ट प्रशिक्षक ….
क्रीडा क्षेत्राच्या भवितव्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षस्थानी विराजमान होऊन खेळाडूंचे स्वप्न साकार करणारे, त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारे, त्यांना न्याय देणारे, खऱ्या अर्थाने क्रीडा संघटना व क्रीडापटूंचे भवितव्य घडवणारे,आदरणीय ” दादा ” सदैव महाराष्ट्राच्या विकासावरच लक्ष केंद्रित करून शिव,फुले, शाहू,आंबेडकर विचारधारेवर विश्वासाने चालणारे ,वेळप्रसंगी कठोर निर्णय घेणारे,स्पष्ट परखड मत व्यक्त करून विरोधकांना अंगावर घेणारे त्याचप्रमाणे चुकणाऱ्या कार्यकर्त्याला ही माफ न करणारे ” दादा” आज आकस्मितरित्या निघून गेले त्यामुळे विविध क्रीडाक्षेत्रातील संघटनांचा व खेळाडूंचा खरा मार्गदर्शक हरपला… हीच दुःखद अंतःकरणाने भावना व्यक्त करून आदरणीय अजितदादा पवार यांना आम्ही आमचे बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनच्या व क्रीडा समन्वय समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे …😞🙇♂️😞 अध्यक्ष लतेंद्र भिंगारे व सर्व पदाधिकारी , विद्यार्थी विद्यार्थिनी….
