February 15, 2026

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमीत हानी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले

0
Screenshot_20260128_100332_WhatsApp
Spread the love

लाडक्या दादांचे निधन हे महाराष्ट्राचे काळीज चिरणारे दुःख

मुंबई दि.28 – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या निधनाची वार्ता संपूर्ण देशाला धक्का देणारी आहे. अजितदादांच्या निधनाचे वृत्त कळताच आम्हाला दुःखाचा प्रचंड धक्का बसला आहे. अजितदादा पवारांचे निधन हे दुःखदायक आणि धक्कादायक आहे. अजितदादा पवार यांच्या निधनाने दिलदार आणि दमदार नेतृत्व; सर्वांचे लाडके दादा; महाराष्ट्राचा लाडका दादा हरपला आहे. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमीत आणि कधीही भरुन येणार नाही अशी हानी झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहअजितदादा पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात अकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांचे निधनाचे वृत्त संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशालाही धक्का देणारे होते. अजितदादांचे विमान अपघाताची वार्ता कळताच मलाही दुःखाचा प्रचंड धक्का बसला. अजितदादा पवार यांच्याशी माझे अत्यंत जवळीक आणि मैत्रीचे संबंध होते. अजितदादांचा स्वभाव दिलदार, परखड, आणि सच्चेपणाचा होता. त्यांच्या शब्दाशब्दांत सच्चेपणा होता. त्यांनी कधीही त्यांच्याकडे येणा-या लोकांना सतत न्याय देण्याचे काम त्यांनी केले. जी काम होतात ती काम त्यांनी तातडीने केली आहेत. मात्र जे काम होत नाही ते काम करण्याचे खोटे आश्वासन त्यांनी कधीच कोणाला दिले नाही. नेहमी खरे बोलणारा, तोंडावर सत्य सांगणारा स्पष्टवक्तेपणा त्यांच्याकडे होता. त्यांच्या मनात आणि त्यांच्या कार्यात नेहमी सच्चेपणा राहिला आहे. कर्तृत्वाची धमक असणारे त्यांचे नेतृत्व होते. प्रवाहाच्या विरोधात जावुनही यशस्वी झालेले त्यांचे नेतृत्च होते. त्यांचा मिश्किल स्वभाव लोकांना आवडणारा होता. ते पहिल्यापासुनच प्रचंड मेहनती, कष्ट करणारे आणि शिस्तीचे नेते होते. ते अभ्यासु नेते होते. महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणाबाबत त्यांचा चांगला अभ्यास होता तसेच ग्रामिण भागांचा सुध्दा त्यांना चांगला अनुभव होता. महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांची त्यांना जाण होती. महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय घेतांना त्यांचा महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दलचा अभ्यास नेहमीच राज्य सरकारच्या उपयोगी आलेला आहे.महाराष्ट्राचा विकास घडवणारे त्यांचे नेतृत्व होत. सामान्य जनतेशी नाळ जुळलेले ते नेते होते. अजितदादा धुरंधर शिस्तप्रिय, दिलदार आणि दमदार नेतृत्व होते.प्रत्येकाला आपला मोठा भाऊ याप्रमाणे दादा वाटत होते. या आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याचे अपघाती निधन होणे हे महाराष्ट्राचे काळीज चिरणारे दुःख आहे.अजितदादा पवारांना मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरातील आंबेडकरी जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो अशी शोकभावना ना.रामदास आठवले यांनी पाठवलेल्या शोक संदेशात व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी