सशक्त भारत निर्मितीसाठी सर्वांचे योगदान महत्वपूर्णमेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांचे विचारः एमआयटी डब्ल्यूपीयूत ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा
पुणे, दि. २७ जानेवारी : “वारसाने मिळालेल्या आपल्या देशाला सशक्त बनविण्यासाठी घुसखोरी थांबविणे, संविधानात बदल, लक्ष्य निर्धारण, प्रत्येकाला आरोग्यासाठी प्रेरणा देणे व भारतीय संस्कृती, सभ्यता आणि परंपरेचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने बहुमूल्य योगदान द्यावे.” असे विचार फिटीस्थान-एक फीट भारतचे संस्थापक व एक्स स्पेशल फोर्सचे मेजर (डॉ.) सुरेंद्र पुनिया यांनी व्यक्त केले
एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन कोथरुड कॅम्पस येथे साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी संस्थापक विश्वस्त प्रा.प्रकाश बी.जोशी व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी ले. कर्नल ऋषीकेश बर्गे, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटीडब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, माईरचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व माईर अंतर्गत असलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती कार्यक्रमाचे सादरीकरण केले. एनसीसीच्या कॅडेट ने सादर केलेल्या परेड ने सर्वांना आकर्षित केले.
मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया म्हणाले,” सैनिकासाठी राष्ट्र आणि समाज हे प्रथम असते. यामुळेच पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनात राष्ट्र निर्मितीसाठी व आरोग्यपूर्ण समाज निर्मितीसाठी रोज ३५ करोड लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जातात. अशा वेळी सर्वांची जबाबदारी आहे की, एक दुसर्याला आरोग्यासाठी प्रेरित करावे.”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,” राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी कोणतेही कार्य करतांना लक्ष्य निर्धारित करावे, मैदानात रोज किमान २ तास खेळावे आणि नोकरी करतांना ५ वर्ष कोणताही जॉब सोडू नये. यामुळे विद्यार्थ्यांना आपले कार्य आणि देशाप्रती आदर निर्माण होईल. ”
डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,” राष्ट्रनिर्मितीसाठी युवकांमध्ये सकारात्मक बदल घडवायचा आहे. त्यासाठी ‘लाईफ ट्रान्सफॉरर्मेशन सेंटर’ ची स्थापना करून युवकांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्टिने प्रगल्भ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून भारतीय संस्कृती व परंपरेशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील सर्व समस्यांचे उत्तर हे शैक्षणिक संस्थेतून मिळू शकते. यासाठी उच्च शिक्षणात एनसीसी ला अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्तावना मांडली. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी प्रताप फुंडे यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे.
