April 1, 2026

असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स ऑफ इंडिया (एएसएसआय) च्या 39 व्या परिषदेचे आयोजन

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे,21 जानेवारी 2026 : पुणे असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स (पीएएसएस) तर्फे असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स ऑफ इंडिया (एएसएसआय) च्या 39 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले. ही परिषद 22 ते 25 जानेवारी 2026 दरम्यान पुण्यातील जे.डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये पार पडणार आहे.

एएसएसआयकॉन 2026 परिषदेच्या आयोजन समितीचे सचिव आणि संचेती हॉस्पिटलच्या स्पाईन आणि न्युरोसायन्स विभागाचे प्रमुख डॉ.शैलेश हदगावकर म्हणाले की, एएसएसआयकॉन 2026 मधील एक महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये अमेरिकन स्कोलिओसिस रिसर्च सोसायटी,ब्रिटिश असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स – बीएएसएस, कोरियन मिनिमली इनव्हेझिव्ह स्पाईन सोसायटी – केओएमआयएसएस, सिंगापूर असोसिएशन ऑफ स्पाईन सोसायटी ॲन्ड एओ स्पाईन – अ ग्लोबल ॲकॅडेमिक कम्युनिटी फॉर स्पाईन केअर यांसारख्या पाच प्रतिष्ठित स्पाईन सर्जन्सच्या संघटना तसेच नेपाळ व श्रीलंका या देशातील प्रतिनिधी भारतात प्रथमच एकत्र येणार आहेत.

आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश पारसनीस म्हणाले की, या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ एकत्र येणार असून सुमारे 1200 स्पाईन सर्जन्स सहभागी होण्याची अपेक्षा आहे.या परिषदेत मणक्याशी संबंधित विविध समस्या,विकृती त्याचे आधुनिक पध्दतीने निदान,उपचार यांसह अनेक शैक्षणिक, तांत्रिक व वैज्ञानिक चर्चासत्रे,शोधनिबंध स्पर्धा,प्रश्नमंजुषा,टेडटॉक्स,बीजभाषणे असे अनेक कार्यक्रम पार पडतील.

पुणे असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स (पीएएसएस) चे खजिनदार डॉ.प्रद्युन्म पै रायतुरकर म्हणाले की,मानेचे दुखणे,कमरेचा त्रास,मणक्याच्या विविध समस्या,स्कोलिओसिससारख्या विकृती,रिव्हीजन स्पाईन समस्या,ऑस्टिओपोरोसिस, लहान मुलांमधील मणक्याच्या समस्या आदी विषयांवर या परिषदेत चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ.एस.के.श्रीवास्तव म्हणाले की, ही परिषद मणक्याच्या समस्यांसाठी शस्त्रक्रिया न करता दिल्या जाणाऱ्या पारंपरिक उपचार पध्दतींचा तसेच मणक्याच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक उपचार व कार्यप्रणालींचा एक उत्कृष्ट मिलाफ ठरणार आहे.

असोसिएशन ऑफ स्पाईन सर्जन्स ऑफ इंडियाचे सचिव डॉ.अप्पाजी कृष्णन म्हणाले,या परिषदेत रोबोटिक स्पाईन शस्त्रक्रिया,नेव्हिगेशन-आधारित स्पाईन शस्त्रक्रिया आणि एंडोस्कोपिक स्पाईन शस्त्रक्रिया यांसारख्या मणक्याच्या शस्त्रक्रियांमधील अत्याधुनिक प्रगत तंत्रांचा समावेश असेल.

डॉ.शैलेश हदगावकर पुढे म्हणाले की, प्रख्यात तज्ञांच्या नेतृत्वाखालील विविध एएसएसआय अभ्यासगट अनेक विषयांवर मार्गदर्शन करतील. यामुळे तरूण पिढीतील मणका शल्यचिकित्सकांना उपचार कार्यप्रणाली तयार करण्याबाबत मार्गदर्शन मिळेल,तसेच सध्या कार्यरत असलेल्या अनेक अनुभवी शल्यचिकित्सकांकडून नवीन संकल्पना समजून घेण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी