April 1, 2026

टाटा हॅरिअर आणि सफारीचे नवे पेट्रोल व्हेरियंट दाखल

0
Harrier and Safari 1.5L HYPERION Turbo-GDi Petrol (2)
Spread the love


पुणे, २० जानेवारी 202६: भारतीय वाहन बाजारपेठेत टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही टाटा हॅरियर आणि टाटा सफारीचे पेट्रोल व्हेरियंट्स अधिकृतरित्या दाखल केले आहेत. आतापर्यंत ही दोन्ही माँडेल्स केवळ डिझेलमध्ये उपलब्ध होते. पेट्रोलचा पर्याय असल्याने ग्राहकांसाठी निवडीचा पर्याय वाढला आहे. टाटा हॅरियर पेट्रोलची एक्स शोरुम किंमत १२.८९ लाख रुपये तर टाटा सफारीची किंमत १३.२९ लाख रुपयांपासून सुरु होते.
उच्च सेगमेन्टमधील लक्झरी फीचर्सने सुसज्ज असलेल्या या दोन्ही एसयूव्ही प्रीमियम SUV ची नव्याने व्याख्या करतात. यात सॅमसंग निओQLED वर चालणारा 36.9 सेंमी सिनेमॅटिक इन्फोटेन्मेंट डिस्प्ले, आकर्षक डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ, बिल्ट-इन ड्युअल डॅश कॅम आणि DVR सह व्हिजन-X E- IRVM, ऑटो रिव्हर्स डिप सह VisionSynk मेमरी ORVM आणि क्लिअरव्ह्यू ड्युअल कॅमेरा वॉशर यांसारखी अत्याधुनिक इनोव्हेशन समाविष्ट आहेत.
या सेगमेन्टमध्ये सर्वोत्तम इंधन-कार्यक्षमता प्रदान करण्याव्यतिरिक्त, यातील संपूर्ण नवीन 1.5L हायपेरियन टर्बो-GDi इंजिनमध्ये बुद्धिमान टेक्नॉलॉजी ठासून भरली आहे, ज्यामुळे हॅरियर आणि सफारी प्रीमियम SUV सेगमेन्टची नव्याने व्याख्या करतात. लेटेस्ट इंजिन टेक्नॉलॉजी आणि AI व ML वर चालणारे इंजिन अतुलनीय आणि निर्दोष परफॉर्मन्स देते आणि शहरातील तसेच महामार्गांवरील प्रवासादरम्यान शक्ती आणि कार्यक्षमता यांचा उत्तम समतोल साधते. या गाड्या उत्कृष्ट राईड आणि हँडलिंग प्रदान करतात, सेगमेन्टमधील सर्वोत्तम NVH स्तरासह प्रीमियम केबिन शांतता सुनिश्चित करतात आणि त्यातील पॉवरट्रेन अशाप्रकारे ट्यून करण्यात आली आहे की, गाडी शहरातील वाहतुकीत स्मूद चालते आणि उच्च वेगात देखील उत्तम स्थिरता कायम ठेवते. एकंदरित, या गुणांमुळे प्रत्येक प्रवास सुखद होतो. हे गुण हॅरियर आणि सफारीला या सेगमेन्टमधील सर्वोत्तम पर्याय म्हणून स्थापित करतात.
हॅरियर आणि सफारीने TMPV ची सुरक्षिततेची परंपरा जपत आता हायपेरियन पेट्रोल इंजिन असलेल्या सर्व व्हेरियन्ट्स साठी परफेक्ट 5-स्टार भारत NCAP रेटिंग मिळवले आहे. त्यामुळे हॅरियर आणि सफारीचा संपूर्ण पोर्टफोलियो 5-स्टार प्रमाणित झाला आहे.
हॅरियर आणि सफारीच्या पोर्टफोलियोमध्ये संपूर्ण नवीन पॉवरट्रेनची भर घालण्याबाबत बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवास्तव म्हणाले, “2.5 लाखापेक्षा जास्त हॅरियर आणि सफारी आत्ता मार्केटमध्ये आहेत. या दोन्ही SUVs नी आधीच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सची डिझाईन, परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेच्या परंपरेचे प्रतीक म्हणून स्थान मिळवले आहे. संपूर्ण नवीन 1.5L हायपेरियन टर्बो-GDi पेट्रोल इंजिन या वाहनांची गुणवत्ता आणखी वाढवते. हॅरियर पहिल्यापासून आपला डायनॅमिक स्टान्स आणि उठून दिसणाऱ्या रूपामुळे एक आयकॉनिक SUV म्हणून ओळखली जाते. आता हायपेरियनची अतुलनीय पॉवर आणि प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव यामुळे हॅरियर आणखी प्रभावी झाली आहे. दुसरीकडे, सफारीने लोकांची आवडती आणि प्रतिष्ठित हाय SUV म्हणून या उद्योगात आपले बस्तान बसवले आहे. सफारीची ही मजबूत परंपरा आता हायपेरियनच्या शांत, आवाज न करणाऱ्या आणि टेक्नॉलॉजीने समृद्ध परफॉर्मन्समुळे अधिक मजबूत झाली आहे.
हा हायपरएफिशन्ट पॉवरट्रेन या सेगमेन्टमधील सर्वोत्तम इंधन-कार्यक्षमता, अतुलनीय परफॉर्मन्स, प्रीमियम रिफाईनमेंट आणि स्मूदनेस प्रदान करतो. जो SUV च्या बोल्ड डिझाईन आणि प्रगत इनोव्हेशन बरोबरच सेगमेन्ट मधील सर्वोत्तम इन-केबिन तंत्रज्ञानाला पूरक आहे. हॅरियर आणि सफारी पेट्रोल एकत्रितपणे, लक्झरी इतकेचे बुद्धिमत्तेला महत्व देणाऱ्या आधुनिक भारतीय ग्राहकासाठी तयार करण्यात आल्या आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी