February 15, 2026

हॅबिल्‍डकडून भारतीयांसाठी ‘हर घर योग’ उपक्रम दाखल

0
Habuild Har Ghar Yoga Image
Spread the love


जून २०२५ मध्‍ये या उपक्रमात ३५ लाखांहून अधिक सदस्‍यांनी नोंद केली, ज्‍यामधून दैनंदिन, घरामध्‍ये घेतल्‍या जाणाऱ्या आरोग्‍याच्या काळजीप्रती वाढती जाणीव दिसून येते
पुणे : नवीन वर्षाची आरोग्यदायी सुरूवात करण्याच्या उद्देशाने हॅबिल्ड या कंपनीने भारतीयांसाठी हर घर योग या उपक्रमाची सुरूवात केली आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना हॅबिल्डसोबत २१ दिवस मोफत योग करण्याची संधी देऊ केली आहे.
या उपक्रमामध्‍ये लाखो व्‍यक्‍तींनी सहभाग घेण्‍यासह हॅबिल्‍डने जागतिक स्‍तरावरील जीवनातील सर्व स्‍तरांमधील लोकांना आरोग्‍याची काळजी घेण्यासंदर्भातील प्रेरित करण्‍याचे आपले मिशन सुरू ठेवले आहे. हर घर योग उपक्रम डिजिटल-केंद्रित, मोठ्या प्रमाणातील उपक्रम म्‍हणून डिझाइन करण्‍यात आला आहे, जो व्‍यक्‍तींना एक वेळचा संकल्‍प किंवा कधीतरी करण्यात येणारा ऐवजी त्‍यांच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये योगचा समावेश करण्‍यास मदत करतो.
लहान, वारंवार केल्‍या जाणाऱ्या कृतींमधून आरोग्‍यदायी सवयी निर्माण होतात, या विश्वासावर हर घर योग हा उपक्रम आधारलेला आहे. यासाठी महागड्या सेटअपची गरज नाही.
आयआयटीचे माजी विद्यार्थी, सरकार-प्रमाणित योग तज्ञ आणि हॅबिल्‍डचे सह-संस्‍थापक सौरभ बोथरा यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत हा उपक्रम निदर्शनास आणतो की, आरोग्‍यासंदर्भात अर्थपूर्ण परिवर्तन दररोज लहान, पण वारंवार केल्‍या जाणाऱ्या कृतींसह सुरू होते.
पारंपारिक फिटनेस आव्‍हानांच्‍या तुलनेत हर घर योग उपक्रम फक्‍त व्‍यायाम म्‍हणून नाही तर मानसिक व शारीरिक आरोग्‍यासाठी दररोज योग करण्‍यास प्रेरित करतो. या उपक्रमाची खासियत म्‍हणजे यूट्यूबवर दररोज लाइव्‍ह, ऑनलाइन योग सत्रे प्रसारित केली जातात. ज्‍यामधून योग करण्‍यासंदर्भात मार्गदर्शन मिळते. तसेच सहभागींमध्‍ये सातत्‍यता आणण्‍यास आणि त्‍यांच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये योगाचा समावेश करण्‍यास मदत होते.
हर घर योग उपक्रमाचा मुख्‍य आधारस्‍तंभ समुदाय आहे. या उपक्रमाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जून २०२५ मध्‍ये ३५ लाखांहून अधिक सहभागींनी नोंद केली. सहभागी एकत्र योग सराव करतात. व्‍हॉट्सअॅप व यूट्यूब अशा प्रचलित प्‍लॅटफॉर्म्‍सचा फायदा घेत हॅबिल्‍डने खात्री घेतली आहे की, हा उपक्रम तंत्रज्ञानप्रेमी नसलेल्‍यांसाठी देखील उपलब्‍ध असेल, ज्‍यासह आरोग्‍यदायी सवयी अंगिकारण्‍यासाठी गुंतागुंतीच्‍या साधनांची गरज भासत नाही, ही संकल्‍पना अधिक प्रबळ होत आहे.
या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत हॅबिल्‍डचे सह-संस्‍थापक व योग टीचर सौरभ बोथरा म्‍हणाले, ”बहुतेक व्‍यक्‍ती आरोग्‍यासंदर्भात मोठे संकल्‍प करत नववर्षाची सुरूवात करतात. पण त्यातील सातत्य राखणे कठीण होते.त्यासाठीच ‘हर घर योग’ उपक्रमांतर्गत आम्‍ही आरोग्‍याची काळजी घेणे सोपे करत आहोत. आमच्या २१-दिवसाच्या मोफत योगप्रवासाद्वारे व्‍यक्‍तींना दररोज लहान स्‍वरूपातील योगामधून देखील दीर्घकालीन परिवर्तन घडून येऊ शकते. हाच अनुभव देण्‍यासाठी उपक्रम डिझाइन करण्‍यात आला आहे. या उपक्रमाचा प्रत्‍येक कुटुंबाला पुढाकार घेत दररोज आरोग्‍यदायी सवय अंगिकारण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे.” २१-दिवस मोफत योग प्रवासासाठी नोंदणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी