April 1, 2026

टायनी टॉट्स प्री-स्कूल स्नेहसंमेलनात चिमुकल्यांचे बहारदार सादरीकरण

0
IMG-20260107-WA0058
Spread the love

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला अर्पण असे विशेष सादरीकरण

पुणे : टायनी टॉट्स प्री-स्कूल, बिबवेवाडी या शाळेच्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य ‘रूबी जयंती’ स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रूबी जयंती’ म्हणजेच प्रेम आणि आनंदातून घडणारी विकासाची वाटचाल या संकल्पनेखाली साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्य, समूह सादरीकरणे आणि अभिनयातून मुलांचा आत्मविश्वास, शिस्त व सर्जनशीलता प्रभावीपणे दिसून आली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला अर्पण केलेले विशेष सादरीकरण हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. कार्यक्रमाला पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी शाळेतील शिक्षकवृंद, सहाय्यक कर्मचारी व पालकांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.

टायनी टॉट्स प्री-स्कूलची स्थापना सुमारे ४० वर्षांपूर्वी दूरदृष्टी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर ठाम विश्वास असलेल्या लता सराफरे यांनी केली. लहान मुलांचे शिक्षण प्रेमळ, सुरक्षित व संस्कारक्षम वातावरणात व्हावे, या उद्देशातून त्यांनी या संस्थेची पायाभरणी केली. त्यांच्या या दृष्टीकोनामुळे टायनी टॉट्सने समाजात एक विश्वासार्ह व आदर्श प्री-स्कूल म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आज हा भक्कम वारसा प्राचार्या नंदिता सराफरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली यशस्वीपणे पुढे जात आहे. आधुनिक शिक्षण पद्धती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अभ्यासक्रम आणि भारतीय मूल्यांचा समतोल साधत शाळा सातत्याने प्रगत होत आहे. सर्वांगीण बालविकास, भावनिक सुरक्षितता आणि आनंदी शिक्षण यावर आधारित शिक्षणपद्धती ही टायनी टॉट्सची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पिढ्यान्‌पिढ्या जपलेला विश्वास, गुणवत्तेची बांधिलकी आणि समाजाशी असलेले दृढ नाते हे टायनी टॉट्सच्या ४० वर्षांच्या यशामागील खरे आधारस्तंभ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी