April 1, 2026

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टजय गणेश रूग्ण सेवा अभियान

0
IMG-20251217-WA0029
Spread the love

२३हजार७५० कर्णबधिरांना
श्रवण यंत्रांचे मोफत वाटप

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षात २३हजार७५० कर्णबधिरांना श्रवणयंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले असून त्यात पुणे जिल्ह्यातील कर्णबधिर मुलांच्या २२ शाळांचा समावेश आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील शाळांमध्ये जावून तेथील मुलांची श्रवण क्षमता तपासणी करण्यात आली. त्यानंतर मोल्ड आणि श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबीरे भरविण्यात आली तेथेही तपासणीनंतर रुग्णांना श्रवण यंत्रांचे मोफत वाटप करून त्यांना दिलासा देण्यात आला, अशी माहिती रासने यांनी दिली.

गणपती ट्रस्ट आणि ज्युपिटर हॉस्पिटल यांनी एकत्रितपणे जन्मतः कर्णबधिर असलेल्या १५ बालकांच्या क्वॉक्लिअर इम्लांट शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणची ही बालके होती. एका शस्त्रक्रियेचा खर्च अंदाजे आठ ते दहा लाख रुपये असतो. ट्रस्टने या शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या, असेही रासने यांनी सांगितले.

श्रवण क्षमता तपासणीसाठी भारती विद्यापीठाच्या ऑडिओमेट्रिक आणि स्पीच थेरपी विभागाचे सहकार्य प्रत्येक शिबीरात ट्रस्टला मिळाले आहे. भारती विद्यापीठामध्ये ट्रस्टच्या मार्फत गेल्यास तिथे श्रवण क्षमता चाचणी मोफत करून देण्यात येते, असेही रासने यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी सूर्योदय फौंडेशन (मुंबई), ॲलिम्को कंपनी, पिनॅकल इंडस्ट्रिज लिमिटेड (पुणे), विपला फौंडेशन (पुणे) आणि लक्ष्य फौंडेशन या संस्थांचे सहकार्य मिळत आहे. उपक्रमाची व्यवस्था सुवर्णयुग तरूण मंडळाकडून पाहिली जाते.

कळावे.

आपला,
सुनील रासने,
अध्यक्ष,
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी