April 1, 2026

लुसिरा ज्वेलरीचे नवे एक्सपिरिअन्स स्टोअर पुण्यात खुले

0
Lucira- Pune Store Launch 3
Spread the love

पुणे : लुसिरा ज्वेलरी या भारताच्या आधुनिक डिझाईन-फर्स्ट उत्कृष्ट ज्वेलरी ब्रॅंडने भारतात शाश्वत लक्झरीचा पुरस्कार करत पुण्यात आपले दुसरे एक्सपीरियन्स स्टोअर उघडले आहे. अंदाजे 2000 चौ. फुट क्षेत्रफळात पसरलेले स्टोअर हे लुसिराचे आजवरचे सर्वात मोठे रिटेल स्टोअर आहे. इंटरॅक्टिव्ह अनुभव देणारे डेस्टिनेशन म्हणून डिझाईन केलेल्या या स्टोअरमध्ये कारागिरी आणि वैयक्तिक अभिव्यक्ती यांची सांगड घालण्यात आली आहे. खास स्टाइलिंगला समर्पित असलेली काऊंटर्स, खुले ले-आउट आणि टच-अँड-फील झोन्स यांच्यासह या दुकानात डिझाईनबाबत चोखंदळ पुणेकरांना आभूषणे खरेदी करण्याचा एक नवा आणि आधुनिक अनुभव मिळणार आहे..
नव्या लॉन्चविषयी बोलताना लुसिरा ज्वेलरीचे सह-संस्थापक रुपेश जैन म्हणाले, “ पुण्याच्या या दुकानात लुसिराच्या संदर्भात अनेक गोष्टी पहिल्यांदा अनुभवता येतील. आभुषणांतील वैविध्यतेसोबतच ग्राहकांना इथल्या वातावरणात खरेदीचा अद्वितिय अनुभव मिळू शकेल. इथे 9KT ज्वेलरी, प्लॅटिनम, एनॅमल पिसेस, आणि नवे कोरे पेटलिक (फुलफुलांची ज्वेलरी) कलेक्शन आहे. ग्राहकांना इथे त्वचेसाठी सुरक्षित, निकल-मुक्त ज्वेलरीचा संग्रह देखील मिळेल, जी दैनंदिन वापरात सुविधेचा विचार करून बनवण्यात आली असून त्यात विशेष प्रसंगांसाठी खास डिझाईन्स आहेत.
पुण्याची वाढती उपभोग-क्षमता, येथे येऊन राहणाऱ्या लोकांमध्ये सुमारे 40% वाढ आणि वापरण्यायोग्य उत्पन्नामध्ये पुण्याचे वरचे स्थान यामुळे लुसिराच्या विस्तारासाठी ती एक स्वाभाविक बाजारपेठ आहे. या शहराची आधुनिक डिझाईन्सची मागणी, शाश्वततेची आवड आणि नव्या युगाचे लक्झरी फॉरमॅट लुसिरा ब्रॅंडच्या मूल्यांशी सुसंगत आहेत.
पुण्याच्या या नव्या दुकानात लुसिराच्या प्रमाणित लॅब-ग्रोन डायमंड आभूषणांची संपूर्ण श्रेणी बघायला मिळेल. यामध्ये सॉलिटेअर्स, विशेष कलेक्शन्स, खास प्रसंगांसाठी अनुकूल आभूषणे आणि दररोज परिधान करण्याजोगी आभूषणे यांचा समावेश असेल. संपूर्ण पारदर्शकतेसाठी, यातील प्रत्येक वस्तू IGI/GIA/SGL प्रमाणित आणि BIS हॉलमार्क असलेली आहे आणि त्यास आजीवन एक्स्चेंज आणि बायबॅक गॅरंटीचे समर्थन आहे. या दुकानाच्या उद्घाटनासह लुसिरा आपल्या ओम्नीचॅनल विस्तार धोरणाला चालना देत आहे. आपल्या दमदार रिटेल आणि फंडिंगच्या चालनेच्या आधारे या ब्रॅंडची FY2026 च्या अखेरपर्यंत महत्त्वाच्या महानगरीय बाजारपेठांमध्ये आणखी काही एक्सपीरियन्स-आधारित दुकाने उघडण्याची योजना आहे.
लुसिराविषयी
लुसिरा हा एक आधुनिक डिझाईन-फर्स्ट उत्कृष्ट ज्वेलरी ब्रॅंड आहे, जो आजच्या चोखंदळ उपभोक्त्यांसाठी लक्झरीची नवी व्याख्या करतो. रूपेश जैन यांनी स्थापन केलेला हा ब्रॅंड नैतिक कारागिरी आणि डिजिटल-फर्स्ट इनोव्हेशन यांची सांगड घालून जीवनातील खास क्षण साजरे करणाऱ्या ज्वेलरी कलाकृती तयार करतो. सध्या लुसिरा ज्वेलरी ऑनलाइन उपलब्ध आहे, आणि या ज्वेलरीची डिलिव्हरी देशभरात सर्वत्र मिळते. एक्सपीरियन्स-आधारित दुकाने उघडून लुसिरा मोठ्या शहरांमध्ये रिटेल विस्तार करत आहे. प्रत्येक लुसिरा कलाकृती प्रमाणित लॅब-ग्रोन डायमंड्स, रिसायकल्ड गोल्ड आणि पारदर्शक प्रक्रियांद्वारे बनवण्यात आली आहे, यातून सिद्ध होते की, शाश्वतता आणि आधुनिकता एकत्र नांदू शकतात. ही आभूषणे अशा ग्राहकांसाठी आहेत, ज्यांच्या लेखी भौतिकवादापेक्षा सार्थकता अधिक मोलाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी