February 15, 2026

राजस्थान प्रवासी दिनी पुण्यातील राजस्थानी बांधवांचा मोठा सहभागजयपूरमध्ये ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन ; पुण्यातून राजस्थान फाऊंडेशन पुणे चॅप्टर प्रतिनिधींचा सहभाग

0
IMG-20251215-WA0014
Spread the love


पुणे : राजस्थानची राजधानी जयपूर येथे नुकताच पार पडलेला राजस्थान प्रवासी दिवस हा यंदा एक ऐतिहासिक सोहळा ठरला. देश-विदेशात वास्तव्यास असलेल्या लाखो राजस्थान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सर्व चॅप्टर्सच्या प्रतिनिधींनी या भव्य कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी राजस्थान फाऊंडेशन पुणे चॅप्टरचा प्रतिनिधी गट हा सर्वांत मोठ्या प्रतिनिधिमंडळांपैकी एक ठरला.

सरकार आणि प्रवासी समाज यांच्यात सेतू निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा संवाद, सहकार्य आणि गुंतवणुकीच्या शक्यतांनी परिपूर्ण होता. पुणे चॅप्टरचे अध्यक्ष मंगलचंद चौधरी हे उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बांठिया, सचिव रमेश कासट, सहसचिव रमेश चौधरी, खजिनदार इंद्रकुमार छाजेड, सदस्य सुभाष अग्रवाल, डॉ. रवींद्र मिणियार, ओमप्रकाश चौधरी, संघटन मंत्री महेंद्र व्यास, संजय खंडेलवाल, राजेंद्र गिल्ल, प्रजापती, जवाहर तिवारी या प्रतिनिधिमंडळासह कार्यक्रमात उपस्थित होते.

परिसंवाद सत्रात मंगलचंद चौधरी यांनी मांडलेले व्हिजन, मिशन आणि गुंतवणूक आराखडे यांनी उपस्थित अधिकारी, तज्ज्ञ आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या सादरीकरणाचे केवळ कौतुकच झाले नाही, तर राजस्थानच्या विकासात प्रवासी समाजाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणारे उत्कृष्ट उदाहरण म्हणूनही त्याकडे पाहिले गेले.

पुणे चॅप्टरने राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी आपण पूर्णतः कटिबद्ध असल्याची घोषणा केली. त्यांच्या योजनांचा सविस्तर तपशील मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याशी होणाऱ्या आगामी बैठकीनंतर जाहीर केला जाईल. यावरून प्रवासी समाज आपल्या राज्याच्या विकासासाठी गंभीर व समर्पित असल्याचे स्पष्ट झाले.

पुणे चॅप्टरसह सर्व प्रवासी राजस्थान्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या, प्रवासी राजस्थान्यांना राज्याच्या विकासात सन्मानपूर्वक सहभागाची संधी दिली आणि मातृभूमीसाठी एकत्र काम करण्याची भावना नव्या दिशेने नेली. राजस्थान प्रवासी दिवस २०२५ हा केवळ एक उत्सव नव्हता, तर प्रवासी आणि मातृभूमी यांच्यात अधिक दृढ होत चाललेल्या नात्याचे प्रतीक ठरला, अशी भावना समाज बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी