February 15, 2026

महा आरोग्य शिबीरात सनसिटी भागातील २६३७ नागरिकांची तपासणीसुहासिनी प्रतिष्ठान व शिवसमर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजन ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा देखील सहभाग

0
IMG-20251213-WA0013(1)
Spread the love


पुणे : रक्ततपासणी, हृदय आजार, ईसीजी तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया, दंत तपासणी व दंत उपचार, कॅन्सर आजार उपचार यांसह संपूर्ण शरीराची तपासणी सनसिटी भागात आयोजित महाआरोग्य शिबीरात करण्यात आली. सुहासिनी प्रतिष्ठान व शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबीरात सनसिटी भागातील २६३७ नागरिकांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आले.

सनसिटी, माणिकबाग, नवीन डीपी रोड, सिंहगड रस्ता येथे आयोजित शिबीरात मोफत केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया, खुब्याची शस्त्रक्रिया, किडनी स्टोन, दुभंगलेले/ फाटलेले ओठ शस्त्रक्रिया, हाडांची ठिसूळता, मधुमेह तपासणी, डायलेलीस, ऍक्युप्रेशर यांसह औषध वाटप करण्यात आले. शिबीराचे आयोजन मंजुषा नागपुरे यांनी केले असून दीपक नागपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबीर घेण्यात आले.

दीपक नागपुरे म्हणाले, डी वाय पाटील आयुर्वेदिक, बॉडी वेलनेस सेंटर, सूर्य सह्याद्री हॉस्पिटल, विघ्नहर्ता डायग्नोस्टिक, जहांगीर हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल, सिल्वर बरस हॉस्पिटल, लायन्स क्लब हॉस्पिटल, देवयानी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, पार्वती नर्सिंगहोम, देशपांडे आय हॉस्पिटल, एचव्ही देसाई हॉस्पिटल, निरामय आयुर्र निसर्गोपचार चिकित्सालय, डी वाय पाटील डेंटल हॉस्पिटल यांसह फुल बॉडी चेकअप, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, अन्नधान्य वितरण विभाग, या विभागांचा शिबीरात समावेश होता. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबीरात सहभाग घेतला.

आयोजिका मंजुषा नागपुरे म्हणाल्या, विविध प्रकारच्या मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया देखील या शिबीराच्या निमित्ताने करण्यात येणार आहेत. आरोग्याचा महायज्ञ करीत असताना निरोगी सिंहगड रस्त्याचा संकल्प करण्यात आला. अनुषंघाने विविध आरोग्यविषयक शासकीय योजना देखील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.

  • फोटो ओळ : सुहासिनी प्रतिष्ठान व शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिबीरात सनसिटी भागातील २६३७ नागरिकांची विनामूल्य तपासणी व उपचार करण्यात आले. यावेळी तपासणीकरिता उपस्थित नागरिक व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी