February 15, 2026

जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन’ उत्साहात साजरा : पुण्यात भव्य रॅलीद्वारे डिजिटल मुक्तीचा संदेश

0
IMG-20251210-WA0014
Spread the love

पुणे: डिजिटल उपकरणांच्या अतिवापराने तुटलेल्या मानवी संबंधांना पुन्हा जोडण्यासाठी आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘झेप फाउंडेशन’ आणि ‘स्वान फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन (World Digital Detox Day – WDDD) आज जगभर उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल ८० देशांमध्ये ही जागतिक डिजिटल वेलनेस चळवळ विविध उपक्रमांनी आयोजित करण्यात आली.

या मिशनला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश शासनाने अधिकृत पाठिंबा दिला असल्याने या चळवळीला राष्ट्रीय स्तरावर मोठे बळ मिळाले आहे.

WDDD चा भाग म्हणून पुण्यात आज सकाळी शनिवार वाडा ते शनीपार चौक या मार्गावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये अनेक मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते: यामध्ये पोलीस उपायुक्त कृषीकेश रावळे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप, ‘झेप फाउंडेशन’च्या अध्यक्ष डॉ. रेखा चौधरी , ‘स्वान फाउंडेशन’ चे अध्यक्ष शशिकांत कांबळे, सचिव प्रसाद भोपळे, सिंहगड फाउंडेशनचे आबा गोळे यांच्यासह अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट आणि हरीभाई देसाई कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. 

‘वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे’ (WDDD) च्या संस्थापिका डॉ. रेखा चौधरी यांनी सांगितले की, “WDDD ही चळवळ केवळ जनजागृती नाही, तर ही मानवतेला वाचवण्यासाठीची जागतिक जबाबदारी आहे. मोबाईल, सोशल मीडिया, कॉम्प्युटर यांसारख्या गॅजेट्सच्या अतिवापरामुळे तुटलेला जगाशीचा संपर्क आणि असंतुलन दूर करण्याचा हा प्रयत्न आहे.” पुढील वर्षी २६ जानेवारी २०२६ पासून ८० देशांमध्ये १० सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ WDDD दूतांसोबत भेटी देईल आणि जागरूकता अभियान राबवेल. ‘WDDD चे 1111 Digital Fasting Formula’ ला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतामध्ये जनजागृतीसाठी काश्मीर ते कन्याकुमारी अशी १०,५०० किमीची रॅली आयोजित करण्यात आली आहे, ज्यात २० राज्यांचा समावेश आहे.

शशिकांत कांबळे म्हणाले की, “डॉ. रेखा चौधरी यांचा हा उपक्रम नवसंजीवनी देणारा असून या चळवळीला जागतिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. ८० पेक्षा अधिक देशांतील मान्यवर आता WDDD चे दूत म्हणून कार्यरत आहेत.” WDDD च्या या यशस्वी आयोजनासाठी जय गणेश व्यासपीठ, सिंहगड परिवार फौंडेशन, अनुराग चारिटेबल ट्रस्ट, हरीभाई देसाई कॉलेज, विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील शाळा आणि दगडू शेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभाल्याचे कांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी