February 15, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी १० डिसेंबर पासून अर्ज स्वीकृती

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत महायुतीतून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच पक्षाच्या उमेदवार निवडीसंदर्भात महत्वाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचे वाटप आणि अर्ज स्वीकृती १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छापील अर्जफॉर्म उपलब्ध राहतील. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित सर्व माहिती अचूकपणे भरून नियोजित वेळेत अर्ज जमा करण्याचे आवाहन पक्षतर्फे करण्यात आले आहे. बैठकीस शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,  प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, बाबूराव धाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, शहर महिला अध्यक्षा हिमाली कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी