भारतात २६५ दशलक्ष सायबर हल्ल्यांची नोंद; सेक्यूराइटने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ जारी केला आणि रॅन्समवेअर रिकव्हरीसाठी इमर्जन्सी सोल्यूशनसोबत डिजिटल रिस्क प्रोटेक्शन सर्विसेस् सुरू केल्या
नवी दिल्ली, ४ डिसेंबर २०२५: जागतिक सायबरसुरक्षा सोल्यूशन्स प्रदाता क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडची उद्योग शाखा सेक्यूराइटने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ जारी करण्यासोबत दोन उद्योग श्रेणीच्या सेवा सादर केल्या आहेत. या सेवा देशाला आतापर्यंत सामना कराव्या लागलेल्या सर्वात प्रखर जोखीम टप्प्याला प्रतिसाद देतात. भारतातील सर्वात मोठे मालवेअर विश्लेषण केंद्र सेक्यूराइट लॅब्सने हा अहवाल विकसित केला आहे. या अहवालामधून जोखीम क्षेत्राचे स्पष्ट चित्र समोर आहे, जे झपाट्याने वाढण्यासह प्रत्येक क्षेत्राला प्रभावित करत आहे.
ऑक्टोबर २०२४ व सप्टेंबर २०२५ दरम्यान सेक्यूराइट लॅब्सने ८ दशलक्षहून अधिक एंडपॉइण्ट्सचे विश्लेषण केले आणि २६५.५२ दशलक्ष डिटेक्शन्सची नोंद केली. हे प्रमाण दैनंदिन ७,२७,००० हून अधिक डिटेक्शन्स आणि दर मिनिटाला ५०५ डिटेक्शन्स इतके आहे. या परिसंस्थेमध्ये ट्रोजन्स व फाइल इन्फेक्टर्सचे प्रमाण सर्वाधिक आहे, जेथे ८.४ दशलक्ष ट्रोजन डिटेक्शन्स आणि ७१.१ दशलक्ष फाइल इन्फेक्टर डिटेक्शन्सची नोंद करण्यात आली. भारतातील कंपन्यांवर झालेल्या एकूण हल्ल्यांपैकी एकत्रित त्यांचे ७० टक्के प्रमाण आहे.
नेक्स्ट जनेरशन अॅण्टीव्हायरस (एनजीएव्ही) आणि अॅण्टी रॅन्समवेअर (एआरडब्ल्यू) इंजिन्सनी ३४ दशलक्षहून अधिक असामान्य क्रियाकलापांना ओळखले. जानेवारी २०२५ मध्ये १८५ घटना आणि ११३,००० डिटेक्शन्ससह रॅन्समवेअर क्रियाकलाप सर्वोच्च होते. क्रिप्टोजॅकिंग डिटेक्शन्स ६.५ दशलक्षपर्यंत पोहोचले. नेटवर्क-आधारित घटना ९.२ दशलक्षपर्यंत पोहोचल्या, जेथे वर्डप्रेस प्लगइन्स, अपाचे टॉमकॅट आणि सिसएड सिस्टम्समध्ये तडजोड करण्याचा वारंवार प्रयत्न करण्यात आला.
प्रदेशानुसार महाराष्ट्र (३६.१ दशलक्ष डिटेक्शन्स), गुजरात (२४.१ दशलक्ष) आणि दिल्ली (१५.४ दशलक्ष) सर्वाधिक प्रभावित राज्ये ठरली, ज्यामध्ये मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकाता सर्वात जास्त लक्ष्यित शहरे होती. उद्योगासंदर्भात शिक्षण, आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्रांचे एकत्रितपणे सर्व डिटेक्शन्समध्ये ४७ टक्के प्रमाण होते, ज्यामधून त्यामधील गांभीर्य आणि संसाधने मर्यादित असल्याचे दिसून येते, ज्यामुळे ते मोठ्या प्रमाणात हल्ल्यांना बळी पडतात.
या निष्पत्तींना पूरक इंडिया सायबरसिक्युरिटी प्रीपेअर्डनेस २०२६ सर्व्हेमधून निदर्शनास येते की, प्रगत मालवेअर संरक्षण (८६.७ टक्के) व बॅकअप सुसज्जता (७८.५ टक्के) अशा क्षेत्रांमध्ये अवलंबन दर मोठ्या प्रमाणात असले तरी घटनेला प्रतिसाद, सुरक्षित कन्फिग्युरेशन आणि मालमत्ता सुरक्षिततेसंदर्भात मोठी तफावत दिसून येते. १० पैकी ६.३७ च्या सरासरी मॅच्युरिटी स्कोअरसह भारताची एकूण सायबरसुरक्षा सुसज्जता असमान आहे, ज्यामुळे कंपन्यांना आधुनिक व झपाट्याने विकसित होत असलेल्या जोखीमांचा धोका आहे.
आजची सायबर जोखीम क्षेत्राची गंभीर स्थिती आणि कार्यसंचालनामध्ये अडथळा आल्यामुळे प्रत्येक वेळी व्यवसायांना होणारे मोठे आर्थिक नुकसान पाहता सेक्यूराइटने रॅन्समवेअर रिकव्हरी अॅज ए सर्विस देखील लाँच केले आहे. हे विशेष रिकव्हरी सोल्यूशन उल्लंघन व रिस्टोरेशनमधील मोठ्या तफावतीला दूर करते, जेथे तज्ञ नेतृत्वित, फॉरेन्सिक श्रेणीची रिकव्हरी देते, ज्यामध्ये प्रगत क्रिप्ट विश्लेषण, सानुकूल रिकव्हरी टूलिंग आणि एनक्रिप्टेड फाइल्स सुरक्षितपणे व त्वरित रिकव्हर करण्यासाठी स्वतंत्र रिस्टोरेशन वर्कफ्लोचा समावेश आहे. त्यांचे प्रमाणित रिस्टोरेशन घटना पुन्हा होण्याला प्रतिबंध करते, तसेच खात्री देते की कोणत्याही छुप्या धोक्यांशिवाय व्यवसाय यंत्रणा पुन्हा काम करू शकतात, ज्यामुळे कंपन्या आत्मविश्वासाने सामान्य स्थितीत येतात. आम्ही सेक्यूराइट डिजिटल रिस्क प्रोटेक्शन सर्विसेस् (डीआरपीएस), सास (SaaS) प्लॅटफॉर्म देखील लाँच केले आहे, जे पांरपारिक आयटी घटकांपलीकडे अस्तित्वात असलेले डिजिटल धोके ओळखण्यासाठी, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. सेक्यूराइट डीआरपीएस एमएल-संचालित थ्रेट डिटेक्शन आणि अंदाजात्मक व सातत्यपूर्ण देखरेखीच्या माध्यमातून उद्योगांना त्यांचे ब्रँड, डेटा व प्रतिष्ठेचे सक्रियपणे संरक्षण करण्यास सक्षम करते. व्यवसायांसाठी, ते बनावट खाती, खोट्या सूची, डोमेन स्पूफिंग आणि आयपीचा गैरवापर यांवर देखरेख ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे बाजारपेठ, सोशल प्लॅटफॉर्म, तसेच डार्क वेबवर सतत देखरेख ठेवून ग्राहकांचा विश्वास आणि ब्रँडचे संरक्षण करता येते. स्वयंचलित, ऑडिट-रेडी अहवाल तपासासाठी तपशीलवार डिजिटल पुरावे देतात, तर समर्पित सेक्यूराइट डीआरपीएस वॉर रूम त्वरित कारवाई, कायदेशीर कारवाई आणि समस्येच्या व्यवस्थापनाची खात्री देते.
या नवीन विकासाबाबत मत व्यक्त करत क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कातकर म्हणाले, ”आज भारतातील सायबर सुरक्षा क्षेत्र महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे, जेथे अनपेक्षित जोखीमांचा सामना करत आहे. इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ चा धोरणकर्ते, उद्योग व नागरिकांना इंटेलिजन्स देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते सर्वसमावेशक जोखीम ओळखू शकतील आणि सक्रिय सायबर सुरक्षा पद्धतींचा अवलंब करू शकतील. लाँच करण्यात आलेले सेक्यूराइट डीआरपीएस कंपन्या फायरवॉल्स व पांरपारिक सुरक्षिततेच्या पलीकडे त्यांची सुरक्षितता अधिक वाढवण्यास सक्षम करेल, जेथे ब्रँड प्रतिष्ठा, डेटा प्रामाणिकपणा व ग्राहक विश्वासाची सतत परीक्षा होत आहे. आम्ही सेक्यूराइट आरआरएएएस देखील लाँच करत आहोत, जे रॅन्समवेअर रिकव्हरीला समस्यांच्या व्यवस्थापनावरून संरचित, तज्ञ-नेतृत्वित ऑपरेशन्समध्ये बदलते, ज्यामुळे रॅन्समवर अवलंबून राहावे लागत नाही. हे उपक्रम कंपन्यांना अत्याधुनिक टूल्स व माहितीसह सुसज्ज करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला प्रबळ करतात, ज्यामुळे कंपन्या आपल्या डिजिटल मालमत्तांचे संरक्षण करू शकतात, विश्वास कायम ठेवू शकतात आणि झपाट्याने वाढत असलेल्या जोखीम वातावरणामध्ये ऑपरेशनल स्थिरता राखू शकतात.”
भारताचे डिजिटल विस्तारीकरण, क्लाऊड अवलंबन आणि मोठ्या वापरकर्तावर्गामुळे रॅन्समवेअर सिंडीकेट्स, सरकारशी संलग्न असल्याचे खोटे दावे करणारे हल्लेखोर आणि सायबरगुन्हेगार समूहांचे प्रमाण वाढत आहे. ऑपरेशन सिंदूर सारख्या सायबरअॅटॅक मोहिममांमधून आर्थिक, राजकीय व विचाराशी संबंधित उद्देशांनी केल्या जाणाऱ्या हायब्रिड हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येते.
इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२६ प्रगत प्रचलित जोखीम क्रियाकलाप, असुरक्षितता, रॅन्समवेअर मोहिमा, मालवेअर समूह आणि हल्ल्यांचे बदलते स्वरूप यांबाबत तपशीलवार माहिती सादर करतो. तसेच, हा अहवाल कृतीशील इंटेलिजन्सला सादर करतो, जे प्रत्येक आकाराच्या कंपन्या अवलंबू शकतात. हा अहवाल भारतातील जोखीम क्षेत्राबाबत माहिती देण्यासोबत आगामी काळासाठी स्पष्ट अंदाज व व्यावहारिक उपाययोजनांना सादर करतो, ज्यांचा उद्योग संदर्भ घेऊन अपेक्षित जोखीमांपासून प्रबळपणे संरक्षण करू शकतात. मागील पर्वामध्ये करण्यात आलेल्या २० अंदाजांपैकी १४ अंदाज खरे ठरले, ज्यामधून भारतातील उद्योगामध्ये उदयास येणाऱ्या जोखीमांचा अंदाज घेण्याची प्रमाणित क्षमता असलेली तज्ञ म्हणून सेक्यूराइटचे स्थान अधिक दृढ होते. यंदाच्या अहवालामधील मार्गदर्शनामध्ये अंदाजात्मक इंटेलिजन्स, ओळखीनुसार संरक्षण, एआय सुरक्षितता, ऑटोमटेड पॅच मॅनेजमेंट, स्थिर फ्रेमवर्क्स, सहयोग आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा समावेश आहे, ज्यसह व्यवसायांना झपाट्याने वाढत असलेल्या गुंतागूंतीच्या वातावरणामध्ये सुरक्षा सुसज्जता वाढवण्यासाठी रोडमॅप मिळाला आहे.