February 15, 2026

टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्‍या विद्यार्थ्‍यांनी जनाटिक्‍स ऑटोमेशन

0
2nd place and best presentation - team “ warriors” (1)
Spread the love

स्किल चॅलेंज २०२५ मध्‍ये चमकदार कामगिरी केली

● १२ पैकी ३ फायनलिस्‍ट टीम्‍समध्‍ये टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी होते
● भारतातील २००० हून अधिक इंजीनिअरिंग, डिप्‍लोमा आणि आयटीआय विद्यार्थ्‍यांनी या
राष्‍ट्रीय स्‍तरीय स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेतला.
बेंगळुरू, नोव्‍हेंबर २६, २०२५: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने आज घोषणा केली की, त्‍यांच्‍या
टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (टीटीटीआय)च्‍या विद्यार्थ्‍यांनी प्रतिष्ठित जनाटिक्‍स ऑटोमेशन स्किल चॅलेंज
२०२५ मध्‍ये प्रथम व द्वितीय स्‍थान पटकावले आहे. पुण्‍यातील जेएसपीएम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग
येथे १२ व १३ नोव्‍हेंबर रोजी आयोजित करण्‍यात आलेला हा दोन-दिवसीय इव्‍हेण्‍ट उदयोन्‍मुख
ऑटोमेशन टॅलेंटसाठी सर्वात मोठे राष्‍ट्रीय व्‍यासपीठ आहे. या स्‍पर्धेमध्‍ये भारतभरातील २००० हून
अधिक इंजीनिअरिंग, डिप्‍लोमा व आयटीआय विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेतला.
एकूण १२ टीम्‍सनी राष्‍ट्रीय स्‍तरावर वाटचाल केली, ज्‍यामध्‍ये टीटीटीआयच्‍या तीन टीम्‍सचा समावेश
होता. पुनीत कुमार, अजय बारिक व भास्‍कर जी. नरसिंगोल यांचा समावेश असलेल्‍या ‘टायटन्‍स’ टीमने
प्रथम स्‍थान पटकावले, तर अंकिता पुजारी, शीतल ए. आणि प्रथम एस. आर. यांचा समावेश असलेल्‍या
‘वॉरियर्स’ टीमने द्वितीय स्‍थान पटकावले, तसेच त्‍यांना ‘बेस्‍ट प्रेझेन्‍टेशन’ पुरस्‍कारासह सन्‍मानित देखील
करण्‍यात आले. जनाटिक्‍सच्‍या टेक्विकलचे एव्‍हीपी श्री. के. गणपती सुब्रमण्‍यम, बजाज ऑटो लि.चे
उपाध्‍यक्ष सुधाकर गुडीपती आणि फॅमिक टेक्‍नॉलॉजीजचे अध्‍यक्ष श्री. चार्बेल नासर यांच्‍या हस्‍ते
विजेत्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
टीकेएमने प्रबळ स्किलिंग फ्रेमवर्क डिझाइन केले आहे, ज्‍यामध्‍ये प्रगत उत्‍पादन पद्धतींसह प्रत्‍यक्ष
प्रशिक्षणाचा समावेश आहे. २००७ मध्‍ये टीकेएमच्‍या बिदादी प्‍लांटमध्‍ये स्‍था‍पना करण्‍यात आलेले
टीटीटीआय या परिसंस्‍थेचा पाया आहे. पूर्णत: निवासी तीन वर्षांचा प्रोग्राम दर्जेदार शिक्षण, टेक्निकल
प्रशिक्षण आणि वैयक्तिक विकासाच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील तरूणांना सक्षम करण्‍यावर लक्ष
केंद्रित करतो. १,४०० हून अधिक पदवीधर आणि १०० टक्‍के प्‍लेसमेंट ट्रॅक रेकॉर्डसह टीटीटीआयच्‍या
माजी विद्यार्थ्‍यांनी राष्‍ट्रीय व जागतिक कौशल्‍य प्‍लॅटफॉर्म्‍सवर सातत्‍याने उत्‍कृष्‍ट कामगिरी केली
आहे.
टीटीटीआयच्‍या ची-तोकू-ताय संकल्‍पनेशी (ची – शैक्षणिक, तोकू – बौद्धिक विकास, ताय – आरोग्‍यदायी
शरीर) संलग्‍न राहत विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा, वेबिनार्स व प्रत्‍यक्ष शैक्षणिक प्‍लॅटफॉर्म्‍समध्‍ये सहभाग
घेण्‍यास प्रेरित केले जाते, जे त्‍यांची मानसिकता, शिस्‍तबद्धता व टीमवर्कला अधिक निपुण करतात.
आपला आनंद व्‍यक्‍त करत टोयोटा किर्लोस्‍कर मोटरच्‍या फायनान्‍स अँड अॅडमिनिस्‍ट्रेशनचे कार्यकारी
उपाध्‍यक्ष श्री. जी. शंकरा म्‍हणाले, ”आम्‍हाला जनाटिक्‍स ऑटोमेशन स्किल चॅलेंज २०२५ मध्‍ये
टीटीटीआयच्‍या विद्यार्थ्‍यांनी संपादित केलेल्‍या उल्‍लेखनीय कामगिरीचा अत्‍यंत अभिमान वाटतो.
आम्‍हाला त्‍यांच्‍या यशस्‍वी प्रवासाचा आनंद होत आहे, तसेच आम्‍ही या टप्‍प्‍यापर्यंत पोहोचण्‍यासाठी
त्‍यांनी घेतलेल्‍या अथक मेहनतीचे कौतुक करतो. टीटीटीआय आपल्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये स्‍पर्धात्‍मक
उत्‍साह, नाविन्‍यता, जिज्ञासूवृत्ती आणि समस्‍या निवारण क्षमतेला चालना देण्‍यावर प्रबळ भर देते.
टीटीटीआयच्‍या माध्‍यमातून आम्‍ही ग्रामीण भागातील तरूणांना जागतिक दर्जाचे टेक्निशियन्‍स
बनवण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत. यासह आम्‍ही स्किल इंडिया मिशन आणि
विकसित भारत २०४७ अशा राष्‍ट्रीय प्राधान्‍यक्रमांप्रती अर्थपूर्णपणे योगदान देण्‍याचा प्रयत्‍न करतो.”

Public

या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍याव्‍यतिरिक्‍त टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (टीटीटीआय)ला नुकतेच कौशल्‍य
कर्नाटक अवॉर्ड फॉर बेस्‍ट इन्स्टिट्यूशन इन स्किल कॉम्‍पीटिशन्‍स पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात
आले, ज्‍यासह भारतात भविष्‍यासाठी सुसज्‍ज कर्मचारीवर्ग घडवण्‍यामधील टोयोटाचे नेतृत्‍व अधिक दृढ
झाले. फ्रान्‍समधील लियोन येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या वर्ल्‍डस्किल्‍स २०२४ मध्‍ये टीटीटीआय-
प्रशिक्षित सहभागींनी अनेक मेडलियन्‍स ऑफ एक्‍सलन्‍स (उत्‍कृष्‍टता पदक) मिळवली, ज्‍यामुळे
जागतिक स्‍तरावर स्‍पर्धात्‍मक टेक्निशियन्‍स घडवण्‍याप्रती इन्स्टिट्यूटची प्रतिष्‍ठा अधिक दृढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी