भवानी पेठ पालखी चौकात दत्त मंदिरात आकर्षक फुलांची व केळीच्या कळ्यांची सजावटआर. आर. किराड परिवारातर्फे आयोजन ; गेली ५० हून अधिक वर्षे सातत्याने व भक्तिभावाने दत्त जयंती उत्सव साजरा
पुणे : श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आर. आर. किराड परिवाराने भवानी पेठ पालखी चौकात त्यांच्या दत्त मंदिरात केलेली आकर्षक फुलांची, फळांची व केळीच्या कळ्यांची सजावट तसेच दिवसभर आयोजित धार्मिक कार्यक्रमांची भव्यता यंदाही सर्व भक्तांच्या मनावर खोल ठसा उमटवून गेली. किराड परिवार गेली ५० हून अधिक वर्षे सातत्याने व भक्तिभावाने दत्त जयंती उत्सव साजरा करत असून, या परंपरेला यंदा पुन्हा एकदा सुंदर साज चढवला गेला.
उत्सवामध्ये सकाळी अभिषेक, महापूजा, अन्नदान तसेच दिवसभर हरिनाम कीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसर फुलांच्या नैसर्गिक आरास, फळांची व केळीच्या कळ्यांनी सजवून मंत्रमुग्ध वातावरण निर्मिती करण्यात आली होती. दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी हजेरी लावली व सुव्यवस्थित व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
उत्सवानंतर आर. आर. किराड परिवाराच्या प्रमुखांनी सांगितले, “भगवान श्री दत्त महाराजांच्या कृपेने व ग्रामस्थांच्या प्रेमामुळे हा उत्सव यंदाही अत्यंत भावपूर्ण व शिस्तबद्धरीत्या पार पडला. गेल्या पन्नास वर्षां पेक्षा जास्त आमचा वारसा आम्ही पुढेही याच श्रद्धेने चालवत राहू. उत्सव यशस्वी करण्यासाठी मदत केलेल्या सर्व भक्तगण, ग्रामस्थ, स्वयंसेवक व हितचिंतकांचे परिवाराने मनःपूर्वक आभार मानले आहेत.
- फोटो ओळ : श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आर. आर. किराड परिवारातर्फे भवानी पेठ पालखी चौकात दत्त मंदिरात आकर्षक फुलांची व केळीच्या कळ्यांची सजावट करण्यात आली होती.
