क्रेडाईकडून भारतातील रिअॅल्टीमधील उत्कृष्टतेचा सन्मान करणारे पहिले ‘रिअल इस्टेट एक्सलन्स अवॉर्ड्स’ लाँच
• संपूर्ण प्रक्रियेचे स्वतंत्रपणे क्रिसिलकडून मूल्यांकन करण्यात येईल, ज्यामधून विश्वसनीयता, निष्पक्षपणा आणि उच्च उद्योग मानकांच्या अनुपालनाची खात्री मिळते.
• हे पुरस्कार शहरांमधील (प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीची शहरे) विकासकांना / प्रकल्पांना सन्मानित करतील.
• डिसेंबरमध्ये उद्घाटनीय इव्हेण्टमध्ये विकासक, धोरणकर्ते व गुंतवणूकदार अद्वितीय राष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर एकत्र येतील, जेथे भारतातील रिअल इस्टेटमधील उत्कृष्टतेचा सन्मान करण्यात येईल.
क्रेडाईतर्फे ‘अवॉइर्ड्स फॉर रिअल इस्टेट एक्सलन्स’ची घोषणा
नवी दिल्ली – भारतातील मालमत्ता बाजारपेठ अधिक पारदर्शक, विश्वासार्ह व दर्जा-केंद्रित क्षेत्रामध्ये विकसित होत असताना कॉन्फडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया (क्रेडाई)ने पहिल्या क्रेडाई अवॉइर्ड्स फॉर रिअल इस्टेट एक्सलन्सच्या लाँचची घोषणा नुकतीच केली. या पुरस्कारांच्या घोषणांचे आयोजन नवी दिल्लीमध्ये १९ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.
हा भारतातील रिअल इस्टेटसाठी महत्वपूर्ण क्षण आहे. रेरा, जीएसटी, आयबीसी, जमिनीच्या नोंदींचे डिजिटायझेशन आणि उदारीकृत एफडीआय नियम यांसारख्या सुधारणांचे पाठबळ असलेले हे पुरस्कार परवडणारी घरे आणि शाश्वत शहरीकरण सारख्या राष्ट्रीय प्राधान्यांना देखील पाठिंबा देतात. हे पुरस्कार क्षेत्रात नाविन्यता, प्रामाणिकपणा व जबाबदार विकासाला चालना देणाऱ्या विकासकांना देखील सन्मानित करतात.
सर्व श्रेणींमध्ये पारदर्शकता, विश्वसनीयता आणि निष्पक्षपणाचे उच्च मानक राखण्यासाठी मूल्यांकन प्रक्रिया डिझाइन करण्यात आली आहे.
क्रेडाईचे अध्यक्ष शेखर पटेल म्हणाले, रेरा, जीएसटी व आयबीसी सारख्या सुधारणांमुळे मजबूत झालेल्या क्षेत्रामध्ये आम्ही नाविन्यतेला जबाबदारीसह, नफ्याला उद्देशासह एकीकृत करणाऱ्या आणि समुदायाला आकार देण्यासोबत भावी पिढ्यांसाठी दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणाऱ्या विकासकांचा सन्मान करण्याचा हा क्षण आहे’
हे पुरस्कार निवासी, व्यावसायिक, मिक्स-युज, हरित विकास, ज्येष्ठ नागरिक व यंग अचीव्हर श्रेणींमधील उत्कृष्टतेला प्रशंसित करतील, तसेच भारतातील शहरांमध्ये विकास करण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणत असलेल्या विकासकांना देखील सन्मानित करतील. पारदर्शक, बहुआयामी फ्रेमवर्कच्या माध्यमातून प्रत्येक श्रेणीचे डिझाइन, अंमलबजावणी, शाश्वतता आणि सामुदायिक प्रभाव यासंदर्भात मूल्यांकन करण्यात येईल.
परिसंस्थेमधील विविध दिग्गजांना एकत्र आणत क्रेडाईचा धोरणाचा हेतू आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांमधील संबंध दृढ करण्याचा मनसुबा आहे, जेथे उद्योगाचा विकास सर्वसमावेशक, पारदर्शक आणि भविष्यासाठी सुसज्ज असण्याची खात्री घेत आहे. डिसेंबरमधील उद्घाटनीय समारोह उत्कृष्टतेला प्रशंसित करण्यासाठी, संवादाला चालना देण्यासाठी आणि भारतातील रिअल इस्टेटच्या भविष्याला आकार देणारे विकासक व प्रकल्पांना दाखवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म ठरेल.
