February 15, 2026

कायनेटिक DX इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीचा शुभारंभ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपासून

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे, महाराष्ट्र, 20 नोव्हेंबर 2025: सुप्रसिद्ध कायनेटिक समूहाची इलेक्ट्रिक वाहनांची शाखा कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सने आपल्या अलीकडेच लॉन्च केलेल्या कायनेटिक DX इलेक्ट्रिक स्कूटरच्या डिलिव्हरीची अधिकृत सुरुवात केली आहे. डिलिव्हरीचा शुभारंभ करताना कंपनीने पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी प्रतिकात्मक डिलिव्हरी केली. ही डिलिव्हरी म्हणजे कायनेटिकचा वारसा जिथे जन्माला आला, त्या पुण्यनगरीला भावपूर्वक वाहिलेली आदरांजली आहे.

1893 मध्ये स्थापन झालेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर हे महाराष्ट्राच्या भक्तीचे आणि सामुदायिक ऐक्याचे प्रतीक आहे. येथे दर वर्षी दर्शनासाठी लक्षावधी लोक येतात. अशा धार्मिक स्थानापासून कायनेटिक DX च्या प्रवासाची सुरुवात करण्याच्या कृतीमधून या ब्रॅंडचे पुण्याशी असलेले घट्ट नाते दिसून येते. ही पुणे आणि समस्त देशासाठी एका भविष्य-उन्मुख गतीशीलतेच्या गाथेची सुरुवात आहे.

ही नवीन कायनेटिक DX श्रेणी एका आधुनिक इलेक्ट्रिक युगात मूळ कायनेटिक DX ची विश्वासार्हता आणि लोकप्रियता घेऊन येत आहे. भारतीय कुटुंबांच्या बदलत्या जीवनशैलीशी सुसंगत बनवलेल्या या स्कूटरमध्ये मजबूत मेटल बॉडी, ऐसपैस फ्लोरबोर्ड आणि सीट खाली या श्रेणीतील सर्वाधिक 37-लीटर स्टोरेज क्षमता आहे. या स्कूटरची ताकद 2.6 kWh रेंज-X LFP बॅटरीत असून जिचे जीवनमान भारतातील इतर NMC बॅटरी-संचालित स्कूटर्सच्या तुलनेत 4 पटींपर्यंत जास्त आहे, शिवाय राईड स्थिरता आणि सुरक्षा आहे.

नित्याच्या सोयी-सुविधांव्यतिरिक्त या स्कूटरमध्ये या सेगमेन्टमध्ये प्रथमच दाखल केलेली फीचर्स आहेत:
ईझी की – खऱ्या अर्थाने त्रास-मुक्त की-लेस संचालनासाठी – होमोलोगेशन मंजुरीच्या अधीन

  • ईझी चार्ज (DX+ वर) – एक रिट्रॅक्टेबल चार्जिंग केबल, ज्यामुळे चार्जिंग सोयिस्कर आणि सहज होते
  • ईझी फ्लिप – अतिरिक्त सुविधेसाठी वन-टच पिलियन फूटरेस्टची मांडणी.

कायनेटिक DX EV मॉडेल रेंज सोबत एक समर्पित मोबाइल अॅप येते, तर DX+ हे व्हेरियन्ट प्रगत टेलीकायनेटिक फीचर्ससह चालकाचा अनुभव अधिक उन्नत करते. या फीचर्समध्ये रियल-टाइम राईडची आकडेवारी आणि वाहनाचा डेटा, जिओ फेन्सिंग, इंट्रूडर अलर्ट, फाइंड माय कायनेटिक, ट्रॅक माय कायनेटिक आणि इतर अनेक फीचर्सचा समावेश आहे. 16 भाषांमधील माय कायनी व्हॉईस अलर्ट्स सह या स्कूटरला एक व्यक्तिमत्व बहाल करण्यात आले आहे. ज्यामध्ये ही स्कूटर चालकाला भेटते, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सुरक्षितता आणि स्कूटरच्या कार्यांबाबत जागरूक देखील करते. या दोन्ही व्हेरियन्टमध्ये ब्लूटुथ मार्फत तत्काळ CRM कनेक्टसाठी एक समर्पित कायनेटिक असिस्ट स्विच आहे. इतर ब्लूटुथ सक्षम फीचर्समध्ये बिल्ट-इन स्पीकर सह म्युझिक आणि व्हॉईस नेव्हीगेशनचा समावेश आहे. कायनेटिक DX आणि DX+ या दोन्ही मॉडेल्समध्ये क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट आणि हिल होल्ड फीचर्स आहेत.

कायनेटिक DX ची किंमत 1,11,499 रु. आहे, तर कनेक्टेड कायनेटिक DX+ ची किंमत 1,17,499 रु. आहे (एक्स-शोरूम, पुणे). DX+ लाल, निळा, सफेद, सिल्व्हर आणि काळा या पाच रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर, DX व्हेरियन्ट सिल्व्हर आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. अधिक माहिती येथे उपलब्ध आहे: www.kineticev.in.

9 वर्षांपर्यंत किंवा 1 लाख किलोमीटरपर्यंत (जे आधी होईल ते) कव्हरेज देणाऱ्या वाढीव वॉरंटी पॅकसह ग्राहक आपला मालकीचा अनुभव आणखी सुधारू शकतात. तसेच 100 किमी पर्यंत रोडसाइड असिस्टन्स (RSA) कव्हरेज मिळवू शकतात. हे पॅकेज कायनेटिक DX आणि कायनेटिक DX+ या दोन्ही मॉडेल्ससाठी उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी