February 15, 2026

भारताच्या विश्वचषक विजेत्या महिला क्रिकेट संघाला मिळणार टाटा सिएरा

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे, ६ नोव्हेंबर २०२५ : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऐतिहासिक विजयोत्सव साजरा करत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स कंपनीतर्फे संघातील प्रत्येक सदस्याला लवकरच लॉन्च होणाऱ्या टाटा सिएराची पहिली लॉट – टॉप-एंड मॉडेल भेट म्हणून देण्यात येणार आहे. संघाच्या अथक प्रयत्नांना, त्यागाला आणि देशाला दिलेल्या या गौरवशाली यशासाठी कंपनीकडून हा सन्मान आहे.

या प्रसंगी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शैलेश चंद्र म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या अद्वितीय कामगिरीने आणि ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशाला अभिमानाची जाणीव करून दिली आहे. त्यांचा प्रवास हा निर्धार आणि आत्मविश्वासाच्या शक्तीचा जिवंत पुरावा आहे. यामुळे प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळाली आहे.भारतीय महिला क्रिकेट संघाला टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सला टाटा सिएराची भेट देताना अत्यंत आनंद होत आहे. दरम्यान, टाटा सिएरा येत्या २५ नोव्हेंबरला बाजारपेठेत पुनरागमनासाठी दाखल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी