April 1, 2026

पेशवेकालीन श्री लक्ष्मीनारायण मंदिरात रांगोळी व दीपोत्सवत्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री शंकर महाराजांची रांगोळी

0
IMG-20251106-WA0042
Spread the love

पुणे : रविवार पेठेतील श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे पेशवेकालीन कालखंडातील प्राचीन मंदिर असून हंड्या आणि झुंबरांनी सुसज्ज असे हे मंदिर भाविकांचे आकर्षण ठरले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कलाकार संजय मोडक आणि गौरी गुमास्ते यांनी सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे स्वरूप आठ बाय चार फूट आकाराच्या रांगोळीत हुबेहूब साकारले असून, ही रांगोळी भाविकांसाठी तीन दिवस पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. मंदिरातील पुरातन कारंजे देखील यानिमित्त सुरू ठेवण्यात आले आहे.

पहाटे श्री लक्ष्मीनारायणास महा-अभिषेक करून नविन पोशाख परिधान करण्यात येतो. देवतांची फुलांनी सुंदर आरास केली जाते. सायंकाळी दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.

या मंदिरात श्री गोकुळाष्टमी, श्रीराम नवमी आणि त्रिपुरी पौर्णिमा हे वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतात. मंदिराचे व्यवस्थापन गेल्या अनेक पिढ्यांपासून येथील वहिवाटदार पुजारी देवेश गुमास्ते आणि गौरी राहुल गुमास्ते हे निष्ठेने व सातत्याने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी