पारदर्शकतेला प्राधान्य देत समर्थ क्रॉपच्या नेतृत्वाचा गुंतवणूकदारांवरील विश्वास अधिक दृढ
पुणे – कृषी क्षेत्राशी संबंधित समर्थ क्रॉप कंपनीने अलीकडेच गुंतवणूकदारांसाठी माहितीपर बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये कंपनीचे संचालक प्रशांत गवळी यांनी थेट संवाद साधत कंपनीच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कंपनीच्या सर्व व्यवहारांत पारदर्शकता आणि निष्ठा यांना सर्वोच्च स्थान असून, गुंतवणूकदारांचे हित जपणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे.
गवळी म्हणाले, “थोडा धीर धरा, सर्व काही सकारात्मक दिशेने जात आहे. कंपनीतील प्रत्येक व्यवहार कायदेशीर चौकटीत, योग्य नियोजनाने आणि दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टिकोनातून केला जातो.” त्यांनी गुंतवणूकदारांना अफवा, अपप्रचार व दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन केले.
अलीकडेच काही व्यक्तींनी कंपनीला ब्लॅकमेल करत कोट्यवधी रूपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप कंपनीने मांडला आहे. या संदर्भात गवळी म्हणाले, “कंपनीविरुद्ध जाणूनबुजून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. पण कंपनी कायदेशीर मार्गाने मजबूत आहे आणि अशा चुकीच्या कृती करणाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.”
बैठकीत मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उपस्थित होते. संवादादरम्यान सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत कंपनीच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. गवळी यांनी शेवटी गुंतवणूकदारांना आश्वस्त केले की, “कंपनीचा विकास हा दीर्घकालीन नियोजनाचा भाग आहे. प्रत्येकाचे पैसे सुरक्षित आहेत आणि येत्या काळात आणखी चांगले परिणाम दिसतील.”
या बैठकीमुळे गुंतवणूकदारांमध्ये स्पष्टता, विश्वास आणि सकारात्मकता वाढताना दिसून आली.
