April 1, 2026

क्विक हील व्‍हर्जन२६ ने भविष्‍यसूचक एआय आणि रिअल-टाइम फसवणूक प्रतिबंधासह डिजिटल गोपनीयतेला अधिक सुरक्षित केले

0
IMG-20251105-WA0060
Spread the love

• एआय व गोपनीयतेचे संयोजन असलेली उद्योगामधील पहिली सुरक्षितता श्रेणी भविष्‍यसूचक धोके ओळखणे आणि फसवणूकीपासून परिपूर्ण संरक्षण देणार.

• सुधारित डार्क वेब मॉनिटरिंग २.० आधार, पॅन, पासपोर्ट आणि वैयक्तिक क्रेडेन्शियल्‍सचे अनधिकृत प्रवेशापासून सतत संरक्षण करते.

• एआय-संचालित सुरक्षा सहाय्यक SIA आणि भारतातील पहिले फसवणूक प्रतिबंध सोल्‍यूशन AntiFraud.AI द्वारे समर्थित.

• सुधारित मेटाप्रोटेक्‍ट वैशिष्‍ट्य एकाच डॅशबोर्डच्‍या माध्‍यमातून सर्व युजर डिवाईसेसवर एकत्रित, दूरस्‍थ सुरक्षा व्‍यवस्‍थापन देते.

पुणे, भारत, ५ नोव्‍हेंबर २०२५: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कपनीने आज क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ च्‍या लाँचची घोषणा केली. कंपनी जगभरातील लाखो व्‍यक्‍तींच्‍या डेटाचे संरक्षण करण्‍याच्‍या तीन दशकांना साजरे करत असताना हे उल्‍लेखनीय लाँच प्रगत गोपनीयता संरक्षण व आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सला एकत्र करत, भारतातील वापरकर्त्‍यांना दररोज त्रास देणारे सर्वसमावेशक सायबर धोके व अत्‍याधुनिक फसवणूक प्रयत्‍नांविरोधात अनपेक्षित संरक्षण देत डिजिटल सुरक्षिततेच्‍या भविष्‍याला नव्‍या उंचीवर नेण्‍यास सज्‍ज आहे.

व्‍हर्जन२६ चे लाँच महत्त्वाच्‍या टप्‍प्‍यावर करण्‍यात आले आहे, जेथे डिजिटल गोपनीयता भारतातील नागरिकांसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. ८५ टक्‍के भारतीयांचा वैयक्तिक डेटा आधीच ऑनलाइन लीक झाला आहे (With 85% of Indians’ personal data already leaked) आणि सायबरगुन्‍हेगार प्रतिमिनिट १.५ लाख रूपयांपेक्षा अधिक नुकसान करत आहेत. हे पाहता क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ या वाढत्‍या आव्‍हानांचे निराकरण करते. नवीन व्‍हर्जन भारतातील व भारताबाहेरील ग्राहक, कुटुंबं आणि व्‍यवसायांसाठी सायबरसुरक्षितता सोपी करण्‍याप्रती ३० वर्षांच्‍या नाविन्‍यता, संशोधन व अविरत कटिबद्धतेला सादर करते.

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. संजय काटकर म्‍हणाले, ”क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ सायबरसुर‍क्षेच्‍या भविष्‍यामधील आमच्‍या धाडसी पुढाकाराला सादर करते. आम्‍ही भारतातील वापरकर्त्‍यांच्‍या संरक्षणाच्‍या ३० वर्षांना साजरे करत असताना ओळखले आहे की, जोखीम क्षेत्र सतत बदलत आहे. आजच्‍या आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी पारंपारिक अँटीव्‍हायरस संरक्षणापेक्षा अधिक मागणी आहे, जेथे एकाच सोल्‍यूशनमध्‍ये गोपनीयता, एआय-समर्थित संरक्षण आणि फसवणूक प्रतिबंधाचे संयोजन असलेल्‍या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची आवश्‍यकता आहे. व्‍हर्जन२६ सह आम्‍ही त्‍या कटिबद्धतेचे पालन करत आहोत. GoDeep.AI, SIA आणि AntiFraud.AI चे एकीकरण यामधील आमच्‍या गुंतवणूकीमधून वापरकर्त्‍यांना दररोज सामना कराव्‍या लागणाऱ्या वास्‍तविक विश्वातील आव्‍हानांबाबत आम्‍हाला असलेली सखोल माहिती दिसून येते. हे लाँच सुरक्षित डिजिटल भारत घडवण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेला दृढ करते, जेथे प्रत्‍येक नागरिक परिपूर्ण आत्‍मविश्वास आणि समाधानासह डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये सहभाग घेऊ शकतो.”

क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ मध्‍ये क्रांतिकारी वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, जे नवीन उद्योग मापदंड स्‍थापित करतात आणि एआय-समर्थित, गोपनीयता-केंद्रित सुरक्षिततेसाठी कंपनीच्‍या दृष्टिकोनाला दाखवतात. भविष्‍यसूचक आर्टिफिशियल इंटेलिजन्‍ससह प्रगत गोपनीयता टूल्‍सचे एकीकरण शक्तिशाली संरक्षण परिसंस्‍था तयार करते, जी धोक्‍यांना नुकसान करण्‍यापूर्वी थांबवते, वापरकर्त्‍यांचे त्‍यांनी आतापर्यंत सामना न केलेल्‍या धोक्‍यांपासून संरक्षण करते.

क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ SIA (सिक्‍युरिटी इंटेलिजण्‍ट असिस्‍टण्ट) सह सुसज्‍ज येते. हे एआय-समर्थित सुरक्षा सहाय्यक प्रत्‍येक डेक्‍स्‍टॉप अँटीव्‍हायरस सॉफ्टवेअरमध्‍ये डिझाइन करण्‍यात आले आहे. SIA सोप्‍या, शब्‍दजाल-मुक्‍त भाषेमध्‍ये सुरक्षेबाबत सूचना देत आणि त्‍यांचे निराकरण करत वापरकर्त्‍याच्‍या अनुभवामध्‍ये बदल करते, तसेच मैत्रीपूर्ण, मानवासारख्‍या संवादाच्‍या माध्‍यमातून क्रमाक्रमाने प्रात्‍यक्षिक व जलद सोल्‍यूशन्‍स देते. या नाविन्‍यतेमधून खात्री मिळते की, सायबरसुरक्षितता सर्व तांत्रिक पार्श्वभूमींमधील वापरकर्त्‍यांसाठी उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे संभ्रम दूर झाला आहे आणि योग्‍य निर्णय घेता येतात.

व्‍हर्जन२६ ची खासियत आहे क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे क्रांतिकारी भविष्‍यसूचक धोका ओळखणारे तंत्रज्ञान GoDeep.AI. हे प्रगत इंजिन लाखो धोक्‍यांना ओळखते आणि दररोज विकसित होत हल्‍ल्‍यांना होण्‍यापूर्वी थांबवते. प्रोग्राम वर्तणूकीवर देखरेख ठेवत आणि त्‍वरित संशयास्‍पद कृतीला ब्‍लॉक करत GoDeep.AI वापरकर्त्‍यांचे आतापर्यंत न झालेल्‍या धोक्‍यांपासून संरक्षण करते, प्रतिक्रियात्‍मक प्रतिसादाऐवजी सक्रिय सुरक्षितता देते.

व्‍हर्जन२६ चे सुधारित डार्क वेब मॉनिटरिंग २.० वापरकर्त्‍यांच्‍या सर्वात संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्‍यासाठी डार्क वेबची सर्वसमावेशक सुरक्षितता देते. आपोआपपणे ईमेल पत्त्यांना ओळखणाऱ्या हँड्स-फ्री क्रियाकलापासह वापरकर्त्‍यांना खात्री मिळते की, त्‍यांच्‍या डिजिटल ओळखीचा गैरवापर, फसवणूक आणि आर्थिक नुकसानापासून सतत संरक्षण केले जात आहे.

आपल्‍या स्‍वतंत्र लाँचच्‍या यशाला अधिक दृढ करत AntiFraud.AI आता क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ मध्‍ये एकीकृत करण्‍यात आले आहे, जे भारतातील वापरकर्त्‍यांना लक्ष्‍य करणाऱ्या दैनंदिन डिजिटल फसवणूकांच्‍या अडथळ्यांविरोधात तत्‍काळ संरक्षण देते. हे वैशिष्‍ट्य फसवे अॅप्‍स, वेबसाइट्स, फसव्‍या यूपीआय विनंत्‍या आणि बँकिंग फसवणूक करणाऱ्या कॉल्‍सना अचूकतेसह ब्‍लॉक करते. हे वापरकर्ते फिशिंग लिंक्‍स व संदेशांवर क्लिक करण्‍यापूर्वी त्‍यांना ओळखते, घोटाळ्यांपासून सर्वसमावेशक संरक्षण देते आणि विकसित होत असलेल्‍या डिजिटल फसवणूक कृत्‍यांपासून पैसे व प्रतिष्‍ठेचे संरक्षण करते. हे एआय-समर्थित डिटेक्‍शन क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या केवायसी-सत्‍यापित डेटामधून सतत माहिती मिळवत राहते, ज्‍यामधून अधिक अचूकता आणि सुधारित ग्राहक विश्वासाची खात्री मिळते.

व्‍हर्जन२६ मध्‍ये सर्वसमावेशक metaProtect एकीकरण देखील आहे, जे वापरकर्त्‍यांना संरचित करण्‍यास आणि त्‍यांच्‍या संपूर्ण डिवाईस परिसंस्‍थेमध्‍ये दुरून सुरक्षितता वाढवण्‍यास सक्षम करते. एकच, एकीकृत डॅशबोर्डमधून वापरकर्ते लॅपटॉप्‍स, फोन्‍स व टॅब्‍लेट्सवर नियंत्रण व देखरेख ठेवू शकतात, घोटाळ्यांना ओळखू शकतात, अनुपालनावर देखरेख ठेवू शकतात आणि डेटा उल्‍लंघनांबाबत रिअल-टाइम अलर्टस् मिळवू शकतात. सोपी नोंदणी प्रक्रिया प्रॉडक्‍ट कीजसाठी गरज दूर करते, ज्‍यामुळे प्रगत सुरक्षितता व्‍यवस्‍थापन सहजसाध्‍य व प्रभावी बनते.

मोठ्या प्रमाणात कामगिरीमध्‍ये सुधारणा करत क्विक हील व्‍हर्जन२६ परफॉर्मन्‍स बूस्‍टरसह येते, जे वापरकर्त्‍यांना डिलीट केलेल्‍या फाइल्‍स सोईस्‍कर सिलेक्‍ट/डिसिलेक्‍ट पर्यायांसह पुन्‍हा स्‍टोअर करण्‍याची सुविधा देते. सुधारित बॅकअॅप अँड रिस्‍टोअर कार्यक्षमता वापरकर्त्‍यांना जुने बॅकअप्‍स डिलीट करण्‍यास आणि उपलब्‍ध डिस्‍क स्‍पेस फ्री अप (रिकामे) करण्‍यास सक्षम करते, ज्‍यामधून सुरक्षिततेबाबत तडजोड न करता परिणामकारक सिस्‍टम कार्यक्षमतेची खात्री मिळते.

क्विक हील टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ विंडोज ११, विंडोज १० आणि विंडोज ८ प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध आहे, जे ३२-बीट व ६४-बीट सिस्‍टम्‍सना सपोर्ट करतात. हे सोल्‍यूशन सिस्‍टमच्‍या कार्यक्षमतेबाबत तडजोड न करता सर्वसमावेशक संरक्षण देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, तसेच वापरकर्ते पूर्णपणे सुरक्षित राहत सुरळीतपणे डिजिटल अनुभवांचा आनंद घेऊ शकण्‍याची खात्री देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी