February 15, 2026

स्पॅनिश रेमेडीज इन्स कडून पुण्यात नैसर्गिक सौंदर्य उपचार उत्पादनांची शृंखला

0
IMG-20251101-WA0019
Spread the love

विविध प्रकारची १७ उत्पादने पुणेकरांच्या सेवेत; नैसर्गिकता, गुणवत्ता आणि टिकाऊपणाला प्राधान्य

पुणे : नैसर्गिक घटकांवर आधारित सौंदर्य आणि आरोग्यवर्धक उत्पादने तयार करणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज इन्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीतर्फे विविध प्रकारची १७ उत्पादने पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहेत. ‘प्रेमाने साकारलेले आणि विश्वासाने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय’ बाळगणाऱ्या स्पॅनिश रेमेडीज या कंपनीने नैसर्गिकता, गुणवत्ता आणि टिकाऊपणा यांना प्राधान्य देणारी उत्पादनशृंखला सादर केली आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेला स्पॅनिश रेमेडीज इन्सचे आर. बी. पाटील (बेंगळुरू), अरुण कुमार (बेंगळुरू), विलास सपकाळ (सातारा), संजय कलाणी (पुणे), तसेच पुण्यातील मुख्य डेपो असलेल्या तपकीर गल्लीतील मोरया एंटरप्रायजेसचे गौरव कर्डक, किसन कर्डक यांसह नरेंद्र सावंत (पुणे) आणि जितेंद्र सुर्वे (कराड) आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पॅनिश रेमेडीजची सर्व उत्पादने १०० टक्के नैसर्गिक घटकांपासून तयार केली जातात. वैज्ञानिक संशोधन आणि पारंपरिक औषधी ज्ञान यांचा संगम साधत कंपनीने विविध प्रकारचे हर्बल साबण, स्किन केअर आणि हेल्थ केअर उत्पादने विकसित केली आहेत. सर्व उत्पादने आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांनुसार प्रमाणित आहेत.

पुण्यातील मोरया एंटरप्रायजेस हे स्पॅनिश रेमेडीजचे अधिकृत वितरण केंद्र असून त्यांनी ‘लेनोमॅक्स (Lenomax)’ या ब्रँड अंतर्गत सौंदर्यवर्धक व केस संवर्धन उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून दिली आहे. या श्रेणीत हर्बल सोप (Handmade Soap), अॅलोव्हेरा वॅक्स पावडर, ऑनियन हेअर ऑइल, व्हिटॅमिन-सी क्रीम, स्किन सिरम, कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स, पोल्ट्री स्प्रे, होम स्प्रे, मच्छर रेफिल, मच्छर कॉम्बो पॅक आणि ओटीसी उत्पादने यांचा समावेश आहे.

कंपनीने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात वितरकांची नुकतीच नियुक्ती केली असून पुणेकरांपर्यंत ही उत्पादने प्रभावीपणे पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हर्बल आणि कॉस्मेटिक क्षेत्रात निसर्गनिष्ठ आणि गुणवत्ता प्रधान उपाय ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा स्पॅनिश रेमेडीजचा मानस आहे. सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रात नवा मानक निर्माण करण्याच्या दिशेने ही कंपनी सातत्याने कार्यरत आहे.

पुण्यातील मोरया एंटरप्रायजेसचे कार्यालय ‘स्वरूप सदन’, दुकान क्र. १, तपकीर गल्ली, बुधवार पेठ, पुणे – ०२ येथे असून, संपर्क क्रमांक ९३०९७७८४६८ / ७६६६९३७७८५ आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी