February 15, 2026

आनंदमठ चित्रपटाविषयी गुरुवारी चर्चात्मक कार्यक्रम

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


पुणे : कार्तिक शुद्ध नवमीपासून वंदे मातरम् गौरव महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत तारखेनुसार ७ नोव्हेंबर या वंदे मारतम्‌ जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी आनंदमठ या हिंदी चित्रपटाविषयी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आनंदमठ या हिंदी चित्रपटाला ७४ वर्ष पूर्ण होत असून या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या वंदे मातरम्‌ या गीतामुळे हा चित्रपट रसिकांच्या आजही आठवणीत आहे. या चित्रपटाविषयी प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर आणि चित्रपट संगीत अभ्यासक धनंजय सप्रे रसिकांशी संवाद साधणार आहे .वन्दे मातरम्‌‍ सार्ध शती जयंती समारोह समिती व जन्मदा प्रतिष्ठान महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे यांच्या प्रमुख सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे . हा संवादात्मक कार्यक्रम दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, टिळक रोड येथे होणार अहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती वंदे मारतम्‌ गीताचे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
प्रति,
मा. संपादक
कार्तिक शुद्ध नवमीपासून वंदे मातरम् गौरव महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी आनंदमठ या चित्रपटाविषयी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
मिलिंद सबनीस, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी