February 15, 2026

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंगतर्फे मोफत “अनॅलिटिक्स विथ टेबल्यू” (“Analytics with Tableau”) या विषयावर व्याख्यान

0
IMG-20250917-WA0102
Spread the love

पुणे, १७ सप्टेंबर २०२५: सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) येथे “अनॅलिटिक्स विथ टेबल्यू (“Analytics with Tableau”) या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शुक्रवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत एससीडीएल (SCDL), च्या ए.व्ही. हॉल, सिम्बायोसिस भवन, १०६५ बी, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे – ४११०१६, येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे वक्ते म्हणून प्रशल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कुशल शर्मा उपस्थित राहणार आहेत. ते आधुनिक डेटा अॅनालिटिक्स आणि टेबल्यू या अत्याधुनिक साधनाचा व्यावहारिक वापर याबद्दल मार्गदर्शन करतील.

या व्याख्यानाचा उद्देश व्यवसाय विश्लेषण (Business Analytics) व माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना प्रत्यक्ष ज्ञान देणे हा आहे. डेटा व्हिज्युअलायझेशन व निर्णय क्षमता वाढवण्यासाठी टेबल्यू कसे उपयुक्त ठरते याबद्दलही व्याख्यानातून महत्त्वपूर्ण माहिती देणार आहेत.

अनॅलिटिक्स विथ टेबल्यू (Analytics with Tableau) म्हणजे काय?
आजच्या डिजिटल युगात मोठ्या प्रमाणावर डेटा (माहिती) निर्माण होतो. या प्रचंड डेटामधून व्यवसायासाठी किंवा संशोधनासाठी उपयुक्त माहिती मिळवणे आवश्यक असते. अनॅलिटिक्स विथ टेबल्यू (Analytics with Tableau) म्हणजेच टेबल्यूया सॉफ्टवेअरचा वापर करून डेटाचे विश्लेषण करणे ही एक आधुनिक पद्धत आहे.

टेबल्यू (Tableau) म्हणजे काय?
टेबल्यू (Tableau) हे एक डेटा व्हिज्युअलायझेशन साधन(Data Visualization Tool) आहे. हे सॉफ्टवेअर वापरून गुंतागुंतीचा डेटा चार्ट्स, ग्राफ्स, डॅशबोर्ड्सच्या स्वरूपात दृश्यरूपात मांडता येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर असलेला डेटा सहज समजण्यास सोपा होतो. चार्ट, ग्राफ, मॅप, डॅशबोर्डद्वारे डेटाचे दृश्यरूप तयार केले जाते. तयार झालेल्या दृश्यांवरून पॅटर्न्स, ट्रेंड्स, वर्तन (behaviour) किंवा भविष्यातील अंदाज लावता येतो. एक्सेल (Excel) शीट्स, डेटाबेस, क्लाउड किंवा ऑनलाईन स्रोतांमधून डेटा आणून गरजेनुसार डेटाची स्वच्छता (cleaning) व वर्गीकरण केले जाते. डेटाचे जलद आणि सोपे विश्लेषण याने निर्णय घेणे सोपे होते. डेटा सादरीकरण (Presentation) हे अधिक आकर्षक व प्रभावी करता येते, व्यवसायिक संधी आणि जोखीम आधीच ओळखता येते, IT, बिझनेस, फायनान्स, हेल्थकेअर, मार्केटिंग अशा सर्व क्षेत्रांमध्ये उपयुक्त हे उपयुक्त साधन आहे.
Registration Link – https://forms.office.com/r/YHrYGwPyhQ

व्यवसाय विश्लेषण आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हे व्याख्यान विशेषतः उपयुक्त ठरणार असून विद्यार्थ्यांनी व इच्छुकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन SCDL तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी