February 15, 2026

“आलेख्य” चित्रप्रदर्शनात दिसणार देवी अहिल्यांचे जीवन आणि महाकुंभाचे वैभव

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे, 15 सप्टेंबर 2025।
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यात “आलेख्य” चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाकुंभाच्या भव्यतेस समर्पित असेल.

हे प्रदर्शन 17 ते 22 सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व कला दालन, पुणे येथे भरविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता होईल. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र दुदी, आयसीसीआर उपकेंद्र पुणे चे संचालक श्री. सुदर्शन शेट्टी तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम) श्री. दीपक कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सांगितले की या निमित्ताने विविध कलाकारांची चित्रकला प्रदर्शित केली जाणार असून त्यात देवी अहिल्यांचा परोपकारी जीवनप्रवास, समाजसुधार कार्ये आणि महाकुंभाचे वैभव यांचे दर्शन घडवले जाईल.

हे प्रदर्शन दररोज सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत कला रसिकांसाठी खुले असेल आणि प्रवेश पूर्णपणे विनामूल्य राहील. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, “आलेख्य” चित्रप्रदर्शन भारतीय कला, संस्कृती आणि इतिहास अनुभवण्याची व जाणून घेण्याची एक अनोखी संधी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी