April 1, 2026

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडे यांची अधिकृत नियुक्ती

0
IMG-20250914-WA0030
Spread the love

मुंबई दि.14 ~ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार असंघटित कामगार क्षेत्रातील टिटवाळा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम बरडे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी अधिकृत निवड करण्यात आली आहे अशी अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.आज मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी गौतम बरडे यांना रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले.

रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी अधिकृत नियुक्त झालेले गौतम बरडे हे टिटवाळा जिल्हा ठाणे येथील रहिवासी असून त्यांनी अनेक वर्षे असंघटित कामगार क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.ठाणे; मुंबई; पालघर ;रायगड सह राज्यभरात गौतम बरडे यांनी असंघटित कामगारांचे संघटन उभे केले असून त्यांनी अनेक असंघटित कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविण्यात गौतम बरडे सदैव प्रयत्नशील असतात. त्यांचे कामगार क्षेत्रातील योगदान पाहून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी गौतम बरडे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्याचे आदेश दिल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आणि राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांच्या स्वाक्षरीने गौतम बरडे यांना राज्य सचिव पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल गौतम बरडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी