टाटा नेक्साँन डाँट ईव्ही आता अधिक सुरक्षित,ADASNexon.ev ADAS सह दाखल
पुणे, 10 सप्टेंबर 2025: भारताची सर्वात मोठी 4-व्हीलर EV उत्पादक TATA.ev ने आज Nexon.ev 45 मध्ये ADAS सुरक्षा टेक्नॉलॉजी दाखल केल्याचे जाहीर केले. या गाडीचे प्रीमियम अपील आणखी वाढवत कंपनीने त्यात रियर विंडो सनशेड आणि अॅंबियन्ट लाइटिंग सारखी फीचर्स देखील दाखल करून ग्राहकांना अधिक मूल्य देऊ केले आहे. या व्यतिरिक्त, TATA.ev ने Nexon.ev #DARK चे अनावरण केले आहे. यामुळे स्टाइल आणि पोर्टफोलियोची वैशिष्ट्ये आणखी वाढवली आहेत.
नव्या दाखल केलेल्या फिचर्समध्ये पर्सोनाचे एम्पॉवर्ड +A 45, एम्पॉवर्ड +A 45 #DARK आणि एम्पॉवर्ड +A 45 रेड #DARK व्हेरियंट्स उपलब्ध असतील. या गाड्यांची किंमत अंदाजे १७.२९लाख रूपयांपासून ते १७.४९ लाख रूपयांपर्यंत आहे.
या नवीन प्रकारांत 5-स्टार भारत-NCAP रेटिंग आहे. अशाप्रकारे संपूर्ण Nexon.ev श्रेणी 5-स्टार सुरक्षा प्रमाणित झाली असून त्यातून भारतीय मार्गांसाठी सुरक्षित वाहने बनवण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेस पुष्टी मिळाली आहे. Nexon.ev 45 मध्ये पहिल्या मालकासाठी आजीवन HV बॅटरी वॉरंटी उपलब्ध आहे.
Nexon.ev 45 पोर्टफोलियोमधील सुधारणांबद्दल टिप्पणी करताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, “TATA.ev मध्ये आमच्या उत्पादनांत निरंतर सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न असतो, जेणेकरून आमच्या ग्राहकांसाठी ही खरेदी अधिक अर्थपूर्ण ठरावी. Nexon.ev हे आम्ही आमच्या उत्पादनांचा मूल्य प्रस्ताव वाढविण्यासाठी त्यांचे आकर्षण अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने कशाप्रकारे प्रयत्न केले आहेत याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ADAS सुरक्षा टेक्नॉलॉजी दाखल करून आणि #DARK आवृत्ती लॉन्च करून आम्ही Nexon.ev मध्ये एक ठळक आणि अत्याधुनिक सौंदर्यदृष्टी आणत आहोत आणि त्याचवेळी या वाहनाची सुरक्षा आणि प्रीमियम गुणवत्ता वाढवत आहोत. Nexon.ev हे ग्राहकांना या श्रेणीतील सर्वोत्तम फीचर्स प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रातिनिधिक रूप आहे आणि ते अशाप्रकारे इनोव्हेशनच्या माध्यमातून मोबिलिटी उद्योगाचे नेतृत्व करण्याच्या आमच्या मिशनला गती देते.”
नवीन दाखल केलेली फीचर्स खालील पर्सोनामध्ये उपलब्ध असतील:
पर्सोना एम्पॉवर्ड +A 45 एम्पॉवर्ड +A 45 रेड #DARK
एक्स-शोरूम किंमत रु. 17.29 लाख 17.49 लाख 17.49 लाख
Nexon.ev #DARK विषयी अधिक जाणून घ्या:
Nexon.ev 45 लाइन-अपमध्ये नवीन दाखल केलेल्या #DARK आवृत्तीमध्ये खास, ऑल-ब्लॅक सौंदर्यदृष्टी सहित एक्स्टीरियरवर डार्क ट्रीटमेंट आणि इंटीरियरमध्ये ऑल-ब्लॅक लेदरेट बोल्स्टर्ड सीट्स आहेत. 350-370 किमी च्या C75 प्रत्यक्ष रेंजसह आणि 40 मिनिटांत 20% – 80% च्या जलद चार्जिंग स्पीड सह Nexon.ev #DARK आपल्यासह पॅनोरमिक सनरूफ, वाहन-ते-वाहन चार्जिंग आणि व्हेइकल टू लोड टेक्नॉलॉजी तसेच 31.24 सेंमी हरमनTM टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम आणि 26.03 सेंमी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रियर विंडो सनशेड आणि अॅंबियन्ट लाइटिंगसाठी एक खास UI आणि UX यांसारखी फीचर्स घेऊन येत आहे.
शिवाय, ADAS फीचरमुळे जी इतर फीचर्स सामील झाली आहेत, ती आहेत- ट्रॅफिक साइन रेकग्निशन (TSR), लेन सेंटरिंग सिस्टम (LCS), लेन डिपार्चर वॉर्निंग (LDW), लेन कीप असिस्ट (LKA), फॉरवर्ड कोलीझन वॉर्निंग (FKW), (पादचारी / सायकलस्वार / कार), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB) (पादचारी / सायकलस्वार / कार), हाय बीम असिस्ट (HBA).
2020 मध्ये लॉन्च झालेली Nexon.ev ही खरोखर एक गेम-चेंजर आहे, जिने भारतात EV क्रांतीची सुरुवात केली. टी आजही भारताची सर्वाधिक विकली जाणारी EV आहे, आणि त्याचे कारण आहे या वाहनात असलेले टेक्नॉलॉजी, परफॉर्मन्स आणि फीचर्स यांचे आकर्षक मिश्रण. सुरक्षेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या Nexon.ev ला भारत-NCAP प्रोटोकॉल अंतर्गत संपूर्ण 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे सर्वार्थाने भारतीय कुटुंबांसाठी ही एक विश्वसनीय गाडी आहे.
–समाप्त–
