April 2, 2026

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये ३४,२३६ युनिट्सची विक्री केली

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


बेंगळुरू, १ सप्‍टेंबर २०२५: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने आज त्‍यांच्‍या विक्री कामगिरीची घोषणा केली. यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेत विकल्या गेलेल्या २९,३०२ युनिट्स आणि निर्यात केलेल्या ४,९३४ युनिट्सचा समावेश आहे.
या महिन्यात कंपनीच्या लोकप्रिय इनोव्हाला २० वर्षे पूर्ण झाली. तर दुसरीकडे कंपनीने आयकॉनिक लक्‍झरी हायब्रिड इलेक्ट्रिक सेदानची स्‍पोर्टीयर आणि अधिक गतीशील अभिव्‍यक्‍ती कॅमरी हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल – स्प्रिंट एडिशन लाँच केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना कंपनीच्या ज्‍ड कार बिझनेसच्‍या विक्री व सेवेचे उपाध्‍यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले की, ”आम्‍ही ऑगस्‍ट २०२५ मध्‍ये ३४,२३६ युनिट्सची विक्री केली, बाजारपेठेत आमची स्थिर उपस्थिती कायम ठेवली आहे आणि आमच्‍या कार व सर्विसेसवर ग्राहकांनी सातत्‍याने दाखवलेल्‍या विश्वासामधून प्रेरणा मिळाली आहे. सप्‍टेंबर महिना एकूण उद्योगासाठी महत्त्वपूर्ण टप्‍पा असेल आणि आम्‍ही बाजारपेठेत उदयास येणाऱ्या ट्रेण्‍ड्सचे बारकाइने निरीक्षण करू. टोयोटामध्‍ये आम्‍ही नाविन्‍यता आणण्‍यावर आणि सणासुदीच्‍या काळात मूल्‍यवर्धित सेवा सादर करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो, तसेच आम्‍हाला ग्राहक समाधानामध्‍ये वाढ होण्‍याची आणि खरेदी निर्णय अधिक सोपा व अधिक आनंददायी करण्‍याची आशा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी