ऑडी इंडियाच्या डिलर सहयोगींकडून नवीन ‘अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम’ लाँच
• डिलर्स जवळपास ६० टक्के हमीपूर्ण भावी मूल्य देतात.
• ऑडी ए४, ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी ए६, ऑडी क्यू५ आणि ऑडी क्यू७ वर उपलब्ध.
मुंबई, २८ ऑगस्ट २०२५: ऑडी इंडियाच्या देशभरातील डिलरशिप्सनी नवीन अशुअर्ड बायबॅक प्रोग्राम लाँच केला आहे. हा प्रोग्राम ग्राहकांच्या भावी वेईकल मूल्याला सुनिश्चित करतो, तसेच ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढवतो आणि सणासुदीच्या काळात मागणीची पूर्तता करतो.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ग्राहकांसाठी ऑडीचे मालक बनण्याचा आनंद मूल्याच्या बाबतीत समाधानाशी संलग्न आहे. आमच्या डिलर सहयोगींनी लाँच केलेल्या अशुअर्ड बायबॅक प्रोग्रामसह ग्राहकांना पारदर्शक एक्झिट किंमत, तसेच सुलभ वित्तपुरवठा आणि विमा संरक्षण मिळते, जे मुदतीच्या शेवटी मूल्यामधील कोणतीही तफावत दूर करते. आमचा विश्वास आहे की, आमच्या डिलर्सनी लाँच केलेला हा प्रोग्राम सणासुदीच्या काळात लक्झरी गतीशीलतेच्या उपलब्धतेमध्ये वाढ करेल.”
अशुअर्ड बायबॅक प्रोग्रामची ठळक वैशिष्ट्ये:
• हमीपूर्ण भावी मूल्य-
o ३ वर्षे / ४५,००० किमीनंतर एक्स-शोरूम किमतीवर ६० टक्के.
o ४ वर्षे / ६०,००० किमीनंतर एक्स-शोरूम किमतीवर ५० टक्के.
• मुदतीच्या शेवटी लो-ईमएआय बलून फायनान्स (फायनान्शियरच्या मंजूरीनुसार).
• सहा मॉडेल्सचे विनासायास मालकीहक्क: ऑडी ए४, ऑडी क्यू३, ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक, ऑडी ए६, ऑडी क्यू५ आणि ऑडी क्यू७.
अधिक माहितीसाठी ग्राहक जवळच्या ऑडी डिलरशिपशी संपर्क साधू शकतात किंवा डिलरशिपच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
