February 16, 2026

सायबर गुन्हेगार सणांच्या उत्सवाला लक्ष्य करत असल्याने क्विक हीलटेक्नॉलॉजीजकडून वापरकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे, १९ ऑगस्ट २०२५: भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होत असताना, सायबर सुरक्षा
उपायांतील जागतिक आघाडीची कंपनी असलेल्या क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडने सायबर
घोटाळ्यांमध्ये अपेक्षित आणि धोकादायक वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. गणेश चतुर्थी,
नवरात्र, दिवाळी आणि ख्रिसमससारखे सण जवळ येत असताना लोक आयआरसीटीसी सारख्या
ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल आणि आघाडीच्या एअरलाइन वेबसाइट्सकडे ट्रेन किंवा फ्लाइट तिकिटे
बुक करण्यासाठी जात आहेत. या गोष्टीची जाणीव असल्याने फसवणूक करणारे अत्याधुनिक
बनावट बुकिंग इंटरफेस आणि बोगस ट्रॅव्हल-पॅकेज ऑफरच्या स्वरूपात सापळे लावत आहेत.
आपले वैयक्तिक आणि पेमेंट तपशील गुन्हेगारांच्या हाती गेल्याचे लोकांना खूप उशिरा कळते.
या सीझनमधील उत्साहामुळे लोक मंडपात, दांडिया नाईट्स आणि इतर उत्सव कार्यक्रमांसाठी
ऑनलाइन पास बुक करतात. गुन्हेगार बनावट तिकीट साइट्स तयार करून किंवा फिशिंग पेजवर
नेणाऱ्या यूपीआय पेमेंट रिक्वेस्ट पाठवून या निकडीचा फायदा घेतात. अशा लिंक्सवर क्लिक
करणाऱ्या किंवा फसव्या यूपीआय प्रॉम्प्टला मान्यता देणाऱ्या ग्राहकांची खाती तात्काळ रिकामी
होतात. दरम्यान, खूप चांगल्या वाटणाऱ्या ई-कॉमर्स ऑफर ग्राहकांना क्लोन केलेल्या
वेबसाइट्सकडे आकर्षित करतात. तिथे छुपे मालवेअर बँकिंग क्रेडेन्शियल्स चोरतात आणि
उत्सवाच्या शुभेच्छा देणारे ई-कार्ड मोबाइल ट्रोजन पोहोचवतात. त्यातून ते संपर्क यादीमध्ये प्रवेश
करतात आणि ओटीपीमध्ये अडथळा आणतात.
तात्काळ मंजुरीचे आश्वासन देणारे इन्स्टंट-क्रेडिट आणि कर्ज अॅप्स हे आणखी एक धोका ठरले
आहेत. इन्स्टॉल केल्यानंतर हे बनावट अॅप्स जास्त परवानग्या मागतात – संपर्कांमध्ये प्रवेश,
एसएमएस संदेश आणि बरेच काही – आणि नंतर पीडितांच्या मित्रांना आणि कुटुंबियांना संदेश
पाठवून घोटाळ्याची व्याप्ती वाढवतात. विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा कॅफेमध्ये सार्वजनिक
वाय-फायवर अवलंबून असलेले चांगले वापरकर्तेदेखील अशा सायबर हल्ल्यांमध्ये अडकू शकतात.
त्यातून त्यांचे व्यवहार हायजॅक होतात किंवा घोटाळे केले जातात.
प्रत्येक यशस्वी हल्ल्यामागे एक साधी गोष्ट असते: जुने सॉफ्टवेअर. सुट्टीच्या गर्दीत, अँटी-
व्हायरस अपडेट्स आणि ऑपरेटिंग-सिस्टम पॅचेस पुढे ढकलणे सहजशक्य आहे. त्यामुळे ड्राइव्ह-
बाय डाउनलोड आणि बँकिंग ट्रोजनसाठी दरवाजे उघडे राहतात. क्विक हील टेक्नॉलॉजीज

लिमिटेड उत्सव नियोजकांपासून कॉर्पोरेट हॉलिडे होस्टपर्यंत सर्वांना ऑनलाइन व्यवहारांची प्रत्यक्ष
वॉलेटप्रमाणेच काळजी घेण्याचे आवाहन करते.
“सणांच्या दरम्यान इनबॉक्स बहुतेकदा “आकर्षक ऑफर्सनी” भरलेले असतात. अर्थात सर्वात
आकर्षक संदेश ट्रोजन असू शकतात. फसवणूक करणारे सुट्टीच्या काळातील फोमोला शस्त्र
बनवतात, ग्राहकांना काऊंटडाऊन किंवा खाते निलंबनाच्या धमक्या देतात. या गोष्टी खरे व्यापारी
उत्सवांमध्ये क्वचितच वापरतात. “प्रिय ग्राहक” सारख्या जनरलाइज्ड शुभेच्छा आणि अस्पष्ट,
ऑफ-ब्रँड ग्राफिक्स हे अतिरिक्त धोक्याचे संकेत आहेत. अनिश्चितता वाटते तेव्हा ब्रँडचे अधिकृत
अॅप उघडून किंवा त्याचा पत्ता स्वतः टाइप करून एम्बेडेड लिंक्स पूर्णपणे बायपास करा.
डिव्हाइसेस आणि बँकिंग अॅप्स अद्ययावत ठेवा आणि क्विक हील अँटीफ्रॉड.एआय सारख्या
व्यापक फसवणूक प्रतिबंधक साधनांवर अवलंबून राहा. लक्षात ठेवा की, आपल्या मनाची शक्ती
ही एक ढाल आहे: एखादी ऑफर खोटी असण्याइतकी भव्य वाटत असेल, तर ती निश्चितच खोटी
आहे”, क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या उत्पादन धोरण प्रमुख स्नेहा काटकर म्हणाल्या.
ग्राहकांनी कायम वेबसाइटची यूआरएल तपासून पाहावी आणि कोणतीही आर्थिक माहिती
देण्यापूर्वी पाठवणाऱ्याची माहिती तपासावी. फक्त अधिकृत स्टोअरमधूनच अॅप्स डाउनलोड करा,
सर्व सुरक्षा आणि ऑपरेटिंग-सिस्टम सॉफ्टवेअरसाठी स्वयंचलित अपडेट्स सक्षम करा आणि
सार्वजनिक नेटवर्कवर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरा. वापरकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित
करणारे Antifraud.AI देखील डाउनलोड करता येते. तसेच, बँक आणि यूपीआय स्टेटमेंट
नियमित तपासून अनधिकृत व्यवहार लवकर ओळखणे शक्य होते आणि प्रियजनांना या सुरक्षा
पद्धतींची माहिती देऊन स्कॅमर्सना वैयक्तिक नेटवर्कद्वारे पसरण्यापासून रोखता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी