प्रलंबित असलेल्या EWS प्रवर्गातील LLB तीन वर्षाच्या पदव्युत्तर पदवी च्या विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ या विद्यार्थ्यांना प्रवेश मान्यता
दि. २० ॲागस्ट २०२५ रोजी. उच्च शिक्षण संचालनालय पुणे येथे गेली अनेक दिवसा पासून प्रलंबित असलेल्या EWS प्रवर्गातील LLB तीन वर्षाच्या पदव्युत्तर पदवी च्या विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ या विद्यार्थ्यांना प्रवेश मान्यता प्रस्ताव प्रक्रिया मधून वगळण्यात आले होते, तरी आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कडे मराठा सेवकानी विषय कानावर घातला आणि दादांनी या बाबत तात्काळ मराठा सेवकांना आदेश दिला व सदरील कार्यवाही साठी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करून तात्काळ विषय मार्गी लावण्या साठी भेट घ्या व स्वतः दादांनी या वरती फोन द्वारे संपर्क साधला आणि दादांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठणकावून सांगितले.
LLB तीन वर्षाच्या पदव्युत्तर पदवी शिक्षण घेत असलेल्या १७०० (एक हजार सातशे) विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे. राज्यातील सर्व २०२३- २०२४ च्या विद्यार्थ्यांना प्रवेश मान्यता प्रस्ताव प्रक्रिया मध्ये येत्या २५ ऑगस्ट पर्यंत समाविष्ट करण्यात येणार आहे. यावर सदरील अधिकाऱ्यांनी अधिकृत अधिसूचना काढली आहे व त्यानुसार कार्यवाही सुरु केली आहे आणि पुढील प्रक्रिया कॉलेजला देखील करू घ्यावी यासाठी आदेश देण्यात आला आहे. या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे सर्व मराठा सेवकानी प्रयत्न केले.
