सामाजिक न्यायाच्या लढ्यातील कर्णधार नेतृत्व म्हणूनकेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्काराने लंडन मध्ये गौरव
लंडन/ मुंबई दि 18 ~ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने लंडन मध्ये आज गौरव करण्यात आला.सुप्रसिद्ध उद्योजक वेदांता ग्रुप चे प्रमुख अनिल अग्रवाल आणि हिंदुजा ग्रुप चे प्रमुख संजय हिंदुजा यांच्या हस्ते ना.रामदास आठवले यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक न्यायाच्या लढाई क्रांतिकारी योद्धे ठरलेल्या रामदास आठवले यांनी दलित वंचित गरीब बहुजन वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी भारतात प्रचंड मोठे योगदान दिले आहे.भारतातील सामाजिक न्यायाच्या लढ्याचे मागील 50 वर्षांपासून कर्णधार राहिलेल्या रामदास आठवले यांचे कर्तृत्व जगभरातील परिवर्तनवादी समतावादी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्यामुळे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्काराने लंडन मध्ये आज सन्मानित करण्यात आले.दैनिक लोकमत च्या वतीने कोहिनूर ऑफ इंडिया या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लंडन मधील सवय या हॉटेलात आयोजन करण्यात आले होते. लोकमत समूहाचे विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यावेळी उपस्थित होते. यावेळी लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्व्हेशन चे आयोजन करण्यात आले होते.
दैनिक लोकमत ने आपल्याला कोहिनूर ऑफ इंडिया हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल ना.रामदास आठवले यांनी लोकमत चे विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांचे आभार मानले आहेत.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
