April 1, 2026

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे’गणेशोत्सव २०२५’करिता अतिदक्षता विभाग

0
IMG-20250813-WA0000
Spread the love

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्या वतीने ‘गणेशोत्सव २०२५’ करिता आपत्कालीन व्यवस्थेसाठी अतिदक्षता विभाग (आयसीयू) कक्ष गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

या अतिदक्षता विभागाचे उदघाटन महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या हस्ते गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरानजीक करण्यात येणार आहे. याप्रसंगी ट्रस्टचे सरचिटणीस, आमदार हेमंतजी रासने, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ.नागनाथ यमपल्ले, पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ.नीना बोराडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत.

अतिदक्षता विभागात तीन आयसीयू बेड्स आणि आठ जनरल बेड्स असतील. याखेरीज डॉक्टर्स, नर्सेस रुग्णांच्या सेवेकरीता सदैव तत्पर असतील. सुवर्णयुग तरुण मंडळ अतिदक्षता विभागाचे व्यवस्थापन पहाणार आहे.

कळावे.

आपला,
सुनील रासने,
अध्यक्ष,
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी