April 1, 2026

-प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-‘दगडूशेठ’ गणपती मंदिराला अंगारकीनिमित्त भव्य पुष्प आरासश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी

0
IMG-20250812-WA0052
Spread the love

पुणे : गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…ओम गं गणपतये नमः :… अशा गणेश नामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रख्यात गायक कुणाल गांजावाला यांनी गायनसेवा दिली. त्यापूर्वी ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. स्वराभिषेकानंतर गणेशयाग व विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडले.

मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरीता शेवंती, झेंडू, गुलाब, लिली, आॅर्केड यांसह विविध फुलांचा समावेश होता. याशिवाय गाभा-यात देखील पुष्प सजावट करण्यात आली. मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढे पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

*फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिराला आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांची गर्दी. पुष्प सजावटीच्या मध्यभागात विराजमान झालेले गणरायाचे विलोभनीय रुप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी